बुलडाणा - शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मांसाहार करा, असा सल्ला देणारे बुलडाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी कोरोना रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने बुलडाणा स्त्री रुग्णालयातील कोविड सेंटरमधील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चिकन बिर्याणी व बॉईल अंड्यांच्या आहाराचे वाटप केले.
हेही वाचा - चिखलीत आधार कोविड केअर सेंटरचे आज उद्घाटन
..हा सल्ला दिला होता
कोरोनाने मृत्यू झालेल्यांमध्ये मुस्लिमांचे अल्प प्रमाण आहे, कारण ते चिकन, मटन अंडे खातात, त्यामुळे त्यांच्या शरिरात प्रतिकारशक्ती जास्त आहे. कोरोनाला हरवण्यासाठी शरिरातील शक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे व ही शक्ती चिकन, मटन आणि अंडे खाल्ल्याने वाढेल. यासाठी मासाहारी पदार्थांचे सेवन करा, असे आवाहन बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी जनतेला केले होते. या प्रकरणात काही वारकऱ्यांनी उडी घेत आमदार गायकवाड यांना फोन करून जाब विचारले व यातून वाद निर्माण होऊन त्याचे ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्यानंतर आज आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाणा स्त्री रुग्णालयातील कोविड सेंटरमधील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चिकन बिर्याणी व बॉईल अंड्यांच्या आहाराचे वाटप केलेे.
शासनाकडून देण्यात आलेल्या नियमानुसार पोषक आहार
नागरिकांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मांसाहार सेवन करावा, अशा गाईडलाईन शासनाकडून देण्यात येत आहेत. त्यानुसार कोरोनाला हरवण्यासाठी शरिरातील शक्ती वाढविण्याकरिता चिकन बिर्याणी व उकळलेल्या अंड्यांचा आहार आज वाटप केल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले.
हेही वाचा - लॉकडाऊन काळात तलावात पोहणे पडले महागात; १८ जणांवर कारवाई