बुलडाणा - शिवसेनेचे विद्यमान आमदर संजय गायकवाड यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर घाटाखालील ग्रामपंचायतीवर पक्षाचा दावा असल्याचे म्हटले होते. दरम्यान त्यांचाविरोधात माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. अश्लील वक्तव्य करून राजकीय व समाजिक क्षेत्रातील माझी प्रतिमा खराब केल्याचा आरोप शिंदे यांनी तक्रारीत केला होता.
दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख केला नसल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. असे मत सरकारी अभियोक्ता यांनी मांडले. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यावर पोलीस कारवाई करता येणार नाही, अशी माहिती बुलडाणा शहर ठाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी दिली.
नावाचा कुठेही उल्लेख केला नसल्याने कारवाई होऊ शकत नाही-
गायकवाड यांच्यावर कलम 294, 503, 504, 506 या कलमांव्ये कायदेशीर कारवाई करण्यासाठी बुलडाणा शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणात सरकारी अभियोक्ता यांच्याकडून मत मागण्यात आले होते. यावर सरकारी अभियोक्तांना तक्रारीची प्रत आणि आमदार संजय गायकवाडांकडून दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ पाठविण्यात आले होता. याबाबत शहानिशा करून आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नावाचा कुठेही उल्लेख केला नसल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही, असे मत सरकारी अभियोक्ता यांनी मांडले आहे. म्हणून माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या तक्रारी वरून आमदार संजय गायकवाड यांच्यावर पोलीस कारवाई करता येणार नाही, अशी माहिती बुलडाणा शहर ठाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी दिली आहे.
काय म्हणाले होते माजी आमदार शिंदे-
आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या प्रतिक्रियेत यापूर्वीही माझ्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे माझा अपमान झालेला असून राजकीय व समाजिक क्षेत्रातील माझी प्रतिमा खराब करायचा डाव त्यांनी रचला आहे, असा आरोप शिंदे यांनी केला. यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास झालेला असून माझे समर्थक व चाहत्यांमध्ये चिड निर्माण झाल्याचे शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा- 'नौकरी द्या, नाहीतर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार करणार परत'