ETV Bharat / state

शेतकरी आंदोलन : बुलडाण्यात 'स्वाभिमानी'चे जागरण-गोंधळ - buldana latest news

केंद्र सरकारला जागे करण्यासाठी रात्रभर जागरण-गोंधळ-भजन चालूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 'स्वाभिमानी'चे हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

स्वाभिमानी
स्वाभिमानी
author img

By

Published : Dec 4, 2020, 12:12 PM IST

बुलडाणा - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुलडाण्यात आंदोलन केले. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे शहरातील मुख्य भागात असणाऱ्या हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासमोर जागरण गोंधळ आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वतः तुपकर यांनी भजन गाऊन आपला अनोखा अंदाज ही आंदोलनस्थळी दाखवून दिला. दरम्यान आंदोलकांनी आंदोलनस्थळीच घरून आणलेल्या ठेचा-भाकरी आस्वाद घेतला. केंद्र सरकारला जागे करण्यासाठी रात्रभर जागरण-गोंधळ-भजन चालूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 'स्वाभिमानी'चे हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

'...अन्यथा राज्यात आंदोलनाचा वणवा पेटेल'

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कमकुवत समजू नये. महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. दिल्लीतील आंदोलनावर सरकारने तोडगा काढला नाही, तर राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटवू, असा इशारा तुपकरांनी दिला आहे. हे आंदोलन फक्त शेतकऱ्यांपुरते मर्यादित नसून ही देश वाचविण्याची लढाई आहे. यासाठी साहित्यिक, विचारवंत, बुद्धिजीवी, तरुण व समाजातील सर्व क्षेत्रातील संवेदनशील मनाच्या व सामाजिक भान जिवंत असणाऱ्या प्रत्येक माणसाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. शेतकऱ्यांची ही लढाई केंद्र सरकारपुरती नसून, खरी लढाई अंबानी-अदाणी-मोदी यांच्याविरुद्ध शेतकरी अशी आहे. असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.