ETV Bharat / state

चारा छावण्या सुरू करा; स्वाभिमानीचा जनावरांसह तहसीलदारांच्या बंगल्यावर मोर्चा - KAILAS FATE

संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांच्या नेवृत्तात जनावरांसह तहसीलदार बंगल्यावर मोर्चा काढला. यासाठी शेतकऱ्यांनी आपापली जनावरे खामगाव मार्गाने तहसीलदार यांच्या घराकडे वळवली पंरतु पोलिसांनी तो मोर्चा एमआयडीसी भागातच अडवला.

चारा छावण्या सुरू करा;
author img

By

Published : May 9, 2019, 10:25 AM IST

बुलडाणा - खामगावात चारा छावण्या सुरू करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. तालुक्यात मोठ्याप्रमाणात चारा आणि पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खामगाव तत्काळ चारा छावणी चालू करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी सुमारे 300 जनावरे घेऊन तहसीलदार शीतल रसाळ याच्या बंगल्यावर मोर्चा काढला. परंतु, बंगल्यावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी एमआयडीसी परिसरातच हा मोर्चा रोखला.

चारा छावणीच्या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी राजू नाकडे हे गेल्या आठ दिवसांपासून वाकुड येथे उपोषण करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांच्या नेवृत्तात जनावरांसह तहसीलदार बंगल्यावर मोर्चा काढला. यासाठी शेतकऱ्यांनी आपापली जनावरे खामगाव मार्गाने तहसीलदार यांच्या घराकडे वळवली पंरतु पोलिसांनी तो मोर्चा एमआयडीसी भागातच अडवला.

शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे या आंदोलनाची दखल तहसीलदार स्वतः आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेतुनही काही मार्ग निघाला नाही. त्यामुळे पुढील दोन ते तीन तास हे आंदोलन सुरूच राहिले. आंदोलक अधिकच आक्रमक होऊ लागल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी आंदोलनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चर्चेअंती चारा छावण्या सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही लवकरच चारा छावण्या सुरू करण्यात येतील, असे आस्वासन दिले आहे. त्यामुळे स्वाभिमानीचे आणि नाकाडे यांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

Intro:Body:स्टोरी:- शेतकऱ्यांचा जनावरांसह तहसीलदाराच्या बंगल्यावर मोर्चा, बंगल्यावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी रोखला मोर्चा ..

लेखी आस्वासन नंतर आंदोलन घेण्यात आले मागे

बुलडाणा:- खामगाव चारा छावण्या सुरू करा या मागणी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून खामगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या 200 ते 300 जनावरे घेऊन तहसीलदार शीतल रसाळ याच्या बंगल्यावर आज 8 में ला मोर्च्या काढला परंतु बंगल्यावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी एमआयडीसी भागात हा मोर्च्या अडवला..

गेल्या आठ दिवसापासून शेतकरी राजू नाकडे याचे तालुक्यातील वाकुड येथे चारा छावण्या सुरू करा
या करिता उपोषण सुरू आहे परंतु या कडे प्रशासन चे दुलक्ष होत आहे त्यामुळे स्वाभिमानि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांच्या नेवृत्तात जनवारासह तहसीलदार याच्या बंगल्यात जनावर सोडो असे आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले जनावर खामगाव च्या मार्गाने आणले परंतु पोलिसांनी ते एमआयडीसी भागातच त्यांना अडवले जो पर्यत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यत आम्ही हटणार नाही अशी शेतकऱ्यांनी पवित्रा घेतला होता त्यावेळी तहसीलदार स्वतः आंदोलन स्थळी जाऊन त्याच्या सोबत चर्चा केली परंतु त्याच्यातही काही मार्ग निघाला नाही त्यामुळे दोन ते तीन तास हे आंदोलन सुरूच होते त्यानंतर उपविभागीय अधिकारी त्या ठिकाणी आले व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलाश फाटे व शेतकऱ्यांन सोबत सवितर चर्चा करून चारा छावण्या सुरू करण्याचा प्रस्थाव जिल्हाधिकारी यांच्या कडे दिला असून लवकरच चारा छावण्या सुरू करण्यात येईल असे आस्वासन देण्यात आले त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले

बाईट:- कैलास फाटे..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.