ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यात रविवारी पुन्हा कडक लॉकडाऊन..

author img

By

Published : Mar 6, 2021, 9:35 PM IST

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. रविवारी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी पुन्हा रविवारला कडक लॉकडाऊन केल्याचा आदेश जारी केले आहे.

strict lockdown again in Buldana
strict lockdown again in Buldana

बुलडाणा - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता यापूर्वीच नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळून सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकानेही सोमवार ते शनिवारी नियमितपणे सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू आहेत. मात्र रविवारला होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी पुन्हा रविवारला कडक लॉकडाऊन केल्याचा आदेश जारी केले आहे.

रविवारी हे राहणार सुरू-

जिल्ह्यात दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 व सायं 6 ते रात्री 9 वाजे पर्यंत नियमितपणे सुरू असतील. या औषधी सेवा, दवाखाने, रूग्णवाहिका सेवा, एस टी वाहतूक 50 टक्के प्रवासी क्षमतेसह, माल वाहतूक, पेट्रोल पंप 24 तास सुरू असतील. टायर पंक्चरची दुकाने नियमित सुरू असतील. पुर्वनियोजित परीक्षा वेळापत्रकानुसार होतील. बँकाचे कामकाज त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहील. या व्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठाने बंद राहतील.

हे ही वाचा - अभिनेत्री सुलोचना लाटकर दादासाहेब फाळके पुरस्कारापासून वंचित का? सरकारला सवाल

शनिवारी सायंकाळी 6 वाजेपासून सोमवारपर्यंत कडक लॉकडाऊन -

शनिवार 6 मार्च रेाजी सायं 6 पासून ते सोमवार 8 मार्च 2021 चे सकाळी 8 वाजेपर्यंत लागू राहील. या कालावधीत कडक लॉकडाऊन लागू असल्याने नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हे ही वाचा - IND Vs ENG : राहुल गांधींनी टीम इंडियाचं केलं अभिनंदन

8 ते 16 मार्चपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन -

जिल्ह्यातील कोविड 19 चा प्रादुर्भाव बघता 16 मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. मात्र या कालावधीत सर्व दुकाने, आस्थापना यांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी 8 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 16 मार्च चे सकाळी 8 वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज शनिवारी 6 मार्च रोजी काढला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.