ETV Bharat / state

Farmers Agitation : जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी रविकांत तुपकरांचा मेन्टनन्स विभागात मुक्काम आंदोलन - जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्ती

सध्या रब्बीचा हंगाम सुरु ( Rabi season started ) असून पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. परंतु जळालेल्या, नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे वीजपुरवठा नाही आणि त्यामुळे पाणी देता येत नाही. मेन्टनन्स विभागात ठिय्या मांडून मुक्काम आंदोलन (Stay protest in maintenance department ) सुरु केले आहे. शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र मिळेपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतल्याने महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे.

Sitin protest
मुक्काम आंदोलन
author img

By

Published : Nov 20, 2022, 11:03 AM IST

Updated : Nov 20, 2022, 11:51 AM IST

बुलढाणा : सध्या रब्बीचा हंगाम सुरु ( Rabi season has started ) असून पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. परंतु जळालेल्या, नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे वीजपुरवठा नाही ( No power supply due to faulty electrical equipment ) आणि त्यामुळे पाणी देता येत नाही. १५ दिवस, महिना - महिना रोहित्र मिळत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ही समस्या पाहता संतप्त झालेल्या रविकांत तुपकर यांनी जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आक्रमक भूमिका घेत चिखली मार्गावरील मेन्टनन्स विभागात ठिय्या मांडून मुक्काम आंदोलन सुरु केले आहे. शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र मिळेपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतल्याने महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे.

मुक्काम आंदोलन

बिले भरुनही विद्युत रोहित्र मिळत नाही : ऐन रब्बी हंगामातच विद्युत रोहित्र वारंवार जळतात आणि ते त्यांच्या दुरुस्तीसाठी महिना - महिना वाट पहावी लागते. नियमानुसार आवश्यक ती रक्कम भरुन, सर्व बिले भरुनही विद्युत रोहित्र मिळत नाही, शेतकरी वारंवार चकरा मारुनही त्यांना विद्युत रोहित्र दिले जात नाही. अधिकारी उडवा-उडवीची उत्तरे देतात. कार्यकारी अभियंता, अपअभियंता कार्यालयात बसत नाही. शेतकऱ्यांना भेटत नाही, त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारी पाहता रविकांत तुपकर यांनी १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शेतकऱ्यांना घेऊन चिखली रोडवरील मेंटेनन्स विभागात धडक दिली आणि तेथेच ठिय्या मांडत मुक्काम आंदोलन सुरु केले. रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले ऑईल उपलब्ध नसल्याचे नेहमी सांगितले जाते, ही अडचण दूर करण्यासाठी जिल्ह्यातील विद्युत रोहित्र दुरुस्तीसाठी जिल्ह्यात तातडीने साठ हजार लिटर ऑईल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी गेल्या आठवड्यातच महावितरणचे साहित्य व्यवस्थापन विभाग मुंबईचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली होती. याबाबत माहिती घेतली असता त्यांनी ऑईल पाठविले असे ते सांगतात तर ऑईल मिळालेच नाही, असे येथील अधिकारी सांगत आहेत.

पिकांना पाणी देणे कठीण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त : महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आधीच खरीपात पावसाने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आणि रब्बीतही विद्युत रोहित्र नसल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. महिना-महिनाभर रोहित्रच मिळत नाहीत तर पिकांना पाणी कधी देणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. चुकीचे बिले देतात आणि बिलांच्या वसुलीचा तगादा लावतात. परंतु पिकांना पाणी देण्यासाठी वीज देत नाही, रोहित्र उपलब्ध करुन देत नाही त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. जिल्हा अधीक्षक अभियंता जायभाये यांच्याशी संपर्क केला असता ते कार्यालयात नाही. लोकप्रतिधींच्या घरी आहे. असे सांगत उडवा-उडवीची उत्तरे देतात त्यामुळे आपण ही भूमिका घेतली असून शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र मिळेपर्यंत आता येथून हटणार नाही. अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केले असून मेंटेनन्स विभागात त्यांनी ठाण मांडत मुक्काम आंदोलन सुरु केले. आहे. तुपकरांच्या या आंदोलनामुळे महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान रात्री उशीरापर्यंत रविकांत तुपकरांचे तेथेच तळ ठोकून होते तर विविध गावातील शेतकरी देखील त्यांच्यासोबत ठिय्या मांडून आहेत.

Last Updated : Nov 20, 2022, 11:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.