ETV Bharat / state

श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे शनिवारी होणार प्रस्थान

श्री गजानन महाराज संस्थानचा 'श्री'चा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीसाठी निघणार आहे. भजनी दिंडी, गज व अश्वासह शनिवारी ८ जूनला सकाळी ७ वाजता या पालखीचे प्रस्थान होणार आहे. श्रींच्या पालखीचे हे ५२ वे वर्ष असून या पालखीसोबत ५०० वारकरी एकूण १२७५ किलोमीटरचा प्रवास २ महिन्यात पूर्ण करणार आहेत.

श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे शनिवारी होणार प्रस्थान
author img

By

Published : Jun 7, 2019, 1:57 PM IST

बुलडाणा - विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा 'श्री'चा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीसाठी निघणार आहे. भजनी दिंडी, गज व अश्वासह शनिवारी ८ जूनला सकाळी ७ वाजता या पालखीचे प्रस्थान होणार आहे. श्रींच्या पालखीचे हे ५२ वे वर्ष असून या पालखीसोबत ५०० वारकरी एकूण १२७५ किलोमीटरचा प्रवास २ महिन्यात पूर्ण करणार आहेत.

Buldana
श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे शनिवारी होणार प्रस्थान

संपूर्ण राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरला विविध संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून आहे. शेगाव येथील श्री गजानन संस्थानचेही १९६८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी खंड न पडता सुरु आहे. यावर्षी पालखीचे हे ५२ वे वर्ष आहे. शेगाव संस्थानने पायी वारीकरीता श्री महाराजांची चांदीची नवीन पालखी बनारस येथील कारागिराकडून तयार करून घेतली आहे. त्यावरील नक्षीकाम अत्यंत कलापूर्ण आहे.

श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत ७२५ किमी आणि पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमीटर असा एकूण १२७५ किलोमीटरचा हा प्रवास आहे. श्रींच्या पालखीला शहरातील श्रींचे प्रगटस्थळ, देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना फराळ, चहा देण्यात येतो. तद्नंतर श्रींची पालखी शनिवारी ८ जूनला श्री क्षेत्र नागझरीकडे प्रस्थान करणार आहे.

पालखीसोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी चहापानी व अल्पोपहाराची व्यवस्था तसेच दुपारी व रात्री भोजन प्रसादाची व्यवस्था केली जाते. तर रात्रीच्या मुक्कामी निवासाची व्यवस्था धर्मशाळा, मंगल कार्यालय व शाळा यामध्ये केलेली असते. दिंडीतील वारकरी मंडळींना आवश्यकतेनुसार औषधे, इंजेक्शन, सलाईन देवून सेवार्थ औषधोपचार करण्यात येतो. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याकरीता टँकरची व्यवस्था केलेली असते.

जाण्याचा मार्ग

श्रींची पालखी ८ जून रोजी श्री क्षेत्र नागझरी, गायगाव, भौरद, अकोला, भरतपूर, वाडेगाव, देऊळगाव, पातुर, मेडशी, श्री क्षेत्र डव्हा, मालेगाव, शिरपूर जैन, चिंचाबा पेन, म्हसला पेन, किनखेडा, रिसोड, पान कन्हेरगाव, सेनगाव, परभणी, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर, मंगळवेढा मार्गे १० जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल.

परतीचा मार्ग

श्री क्षेत्र पंढरपूर येथे १० ते १५ जुलैपर्यंत मुक्काम राहून करकंब, कुर्डूवाडी, भगवान बार्शी, पाली, बिड, गेवराई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेडराजा, जालना, लोणार, मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार व खामगाव येथे १६ ऑगस्ट रोजी मुक्काम व ६ ऑगस्ट रोजी श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा संतनगरीत दाखल होईल.

Intro:Body:बुलडाणा : विदर्भाची पांढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा 'श्री'चा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह उद्या शनिवारी ८ जून रोजी सकाळी ७ वाजता प्रस्थान करणार आहे. श्रींच्या पालखीचे हे ५२ वे वर्ष असून या पालखी सोबत ५०० वारकरी एकूण १२७५ किलोमीटरचा विठ्ठलाच्या जयघोषात २ महिन्यात पूर्ण करणार आहेत.

संपुर्ण राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरला विविध संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून आहे. शेगाव येथील श्री गजानन संस्थानचे हि १९६८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी खंड न पडता सुरु आहे. यावर्षी पालखीचे हे ५२ वे वर्ष असून या दिंडीमुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्वांचा लोकांना बोध होतो. व आध्यात्मिक कार्य गतीमान होवून धर्माप्रती श्रध्दा व भावना वृध्दीगंत होतात. दारिद्रय, अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी गावे पायी वारीच्या वाटेत आहेत. श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत ७२५ कि.मी. आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमीटर आहे. असा एकुण प्रवास १२७५ किलोमीटरचा आहे. श्रींच्या पालखीला शहरातील श्रींचे प्रगटस्थळ, देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना फराळ, चहा देण्यात येतो. तद्नंतर श्रींची पालखी शनिवारी ८ जून ला श्री क्षेत्र नागझरीकडे प्रस्थान करणार आहे. संतनगरीतील हजारो भक्तगण आपल्या लाडक्या राजाला प्रेमाने निरोप देतात. श्रींचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी चहापानी व अल्पोपहाराची व्यवस्था केलेली राहते. तसेच श्रींच्या पालखीचे गावातील नागरीकाकडून मनोभावे श्री महाराजांना शाल, श्रीफळ वाहून स्वागत केल्या जाते. श्रींचे पालखी सोबत प्रवास करताना वारक-यांची दुपारी व रात्री भोजन प्रसादाची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे वाटेने चहापानी व फराळाची व्यवस्था सुध्दा श्रींच्या भक्तांकडून केल्या जाते. रात्रीचे मुक्कामी निवासाची व्यवस्था धर्मशाळा, मंगल कार्यालय व शाळा यामध्ये केलेली असते. दिंडीतील वारकरी मंडळींना आवश्यकतेनुसार औषध, इंजेक्शन, सलाईन देवून सेवार्थ औषधोपचार करण्यात येतो. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याकरीता टँकरची व्यवस्था केलेली असते. शेगाव संस्थानने पायी वारीकरीता श्री महाराजांची चांदीची नवीन पालखी बनारस येथील कारागिर आणून तयार करून घेतली आहे. त्यावरील नक्षीकाम अत्यंत कलापूर्ण असून ही पालखी पाहताक्षणीच अंत:करणातील भक्तीभाव उंचबळून येतो.

जाण्याचा मार्ग
८ जून रोजी श्री क्षेत्र नागझरी, गायगाव, भौरद, अकोला, भरतपूर, वाडेगाव, देऊळगाव, पातुर, मेडशी, श्री क्षेत्र डव्हा, मालेगाव, शिरपूर जैन, चिंचाबा पेन, म्हसला पेन, किनखेडा, रिसोड, पान कन्हेरगाव, सेनगाव, परभणी, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर,मंगळवेढा मार्गे १० जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचेल.

परतीचा मार्ग
श्री क्षेत्र पंढरपूर येथे १० ते १५ जुलैपर्यंत मुक्काम राहून करकंब, कुर्डूवाडी, भगवान बार्शी, पाली, बिड, गेवराई, शहापूर, लालवाडी, जालना, सिंदखेडराजा, जालना, लोणार, मेहकर, जानेफळ, शिर्ला नेमाने, आवार व खामगाव येथे १६ आॅगस्ट रोजी मुक्काम व ६ ऑगस्ट रोजी श्रीहरी विठ्ठल... जयहरी विठ्ठल... व गण गणात बोते.. च्या नामगजरात श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळासंतनगरीत दाखल होईल.

-वसीम शेख, बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.