बुलडाणा : जिल्ह्यातील चिखली तालुक्यात ४ दिवसा पूर्वी सहा वर्षीय चिमुकलीची हत्या झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. चिखली तालुक्यातील रोहडा येथे तपोवन देवी संस्थानात आपल्या आई वडिलांसोबत लग्नाला आलेल्या या चिमुकलीची का व कुणी हत्या केली असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर चौथ्या दिवशी पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे. रोहडा गावातीलच एका 24 वर्षीय नराधमाने या चिमुकलीला खाऊ देण्याच्या बाहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, केलेले कृत्य कुणाला माहित पडू नये म्हणून तिचा रुमालाने गळा आवळून खून केल्याचे आता उघड झाले आहे.
सहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार : गेल्या चार दिवसापासून पोलीस या नराधमाच्या शोधात होते. वेगवेगळ्या माध्यमातून चौकशी केल्यानंतर शेवटी या नराधमाने गुन्ह्याची कबुली दिली आहे. शिवाय शवविच्छेदन अहवालातून पीडित सहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचही समोर आले आहे. त्यामुळे समाज भावना आणखीनच तीव्र झाल्या आहेत. 24 वर्षीय नराधम हा रोहडा गावातीलच असल्याचे समोर आले आहे. सदानंद रोडगे अस अत्याचार करणाऱ्या कृरकर्म्याचे नाव आहे. अंढेरा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मुलीचा मृतदेह सापडला : चिखली तालुक्यातील तपोवन देवी मंदिर परिसरातून हरवलेल्या सहा वर्षीय चिमुरडीचा मृतदेह तपोवन मंदिर परिसरातील मागील भागात आढळून आला होता. बाळापूर येथील मूळ निवासी असलेले नवनाथ गायकवाड ( नाव बदलेले आहे) आपल्या परिवारासह एका लग्नानिमित्त चिखली परिसरात आले होते. तेव्हा त्यांची चुमुकली बेपत्ता झाली होती. बुलडाणा जिल्हा पोलीस प्रशासनासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी चुमुकलीचा शोध घेतला. तेव्हा दुपारी तीन वाजेच्या दरम्यान तपोवन देवीच्या मंदिर परिसरातील मागील भागात तिचा मृतदेह आढळून आला होता.
आरोपीला बेड्या ठोकल्या : चेहरा पूर्णपणे ठेचण्यात आलेला दिसत होता. अंगावरचे सर्व कपडे व्यवस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंदिराच्या मागील परिसर डोंगराळ असून 500 मीटर अंतरावर चिमुरडीचा मृतदेह सापडला. दुपारी जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांनी संपूर्ण मंदिर परिसराचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हा चिमुकली आढळून आली. तिची हत्या कोणी का? केली हे तेव्हा कळू शकले नव्हते. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा -
- NCP Core Committee Meeting : पक्षातच फिरणार भाकरी; आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रावादीचे प्लॅनिंग
- BJP MLA Cheating Case : मंत्रिपदाचे गाजर देऊन भाजप आमदारांची फसवणूक प्रकरण, ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
- Sanjay Raut : संजय राऊत यांच्या विरोधातील विशेषाधिकार भंग प्रस्तावावर राज्यसभेचे सभापती निर्णय घेणार