बुलडाणा - मलकापूर येथे ४ कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने शहर शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मलकापूरच्या पोलीस एसडीपीओ लेडी सिंघम प्रिया ढाकणे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरल्या आहेत. लॉकडाऊन दरम्यान फिरणाऱ्या महिलांना त्यांनी कोरोनाचा संकट समजावून घरा बाहेर न पडण्याचे आवाहन करायला सुरुवात केली आहे. यामुळे या लेडी सिंघमची चर्चा जिल्ह्यात होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात एकूण २१ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहे. यामध्ये ४ रुग्ण मलकापुरात आढळले असून खबरदारी म्हणून मलकापूर शहर शंभर टक्के लॉकडाऊन केले आहे. फक्त अत्यावश्यक सेवा नागरिकांना घरपोच देण्याचा निर्णय नगर परिषदेकडून घेण्यात आला आहे.अशातच मलकापूर विभागाची धुरा सांभाळणाऱ्या एसडीपीओ प्रिया ढाकणे या लेडी सिंघम आपल्या कर्तव्यदक्षपणाचे उदाहरण देत आहेत. त्या शहरातील विविध चौकात थेट आपल्या कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून याकाळात फिरणाऱ्या महिलांना कोरोनाचे संकट समजावून सांगत घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहे. यावेळी त्यांना हनुमान चौकात अशा अनेक महिलांना समजवून परत घरी पाठविले. त्यांच्यासोबत मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास नागरे देखील लॉकडाऊन तोडणाऱ्या टवाळखोरांना खाकी दाखवून त्यांच्यावर कारवाई करीत आहे.
मलकापुरात एसडीपीओ लेडी सिंघम उतरल्या रस्त्यावर... कोरोना विषयी केली जनजागृती - बुलडाणा लेडी सिंघम
मलकापुरच्या पोलीस एसडीपीओ लेडी सिंघम प्रिया ढाकणे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून लॉकडाऊन दरम्यान फिरणाऱ्या महिलांना कोरोनाचा संकट समजावून घरा बाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहे.