ETV Bharat / state

बुलडाण्यात १० महिन्यानंतर वाजली घंटा.. 1 हजार 595 शाळा सुरू, 34 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती - बुलडाणा शाळा सुरू

कोरोना आजाराने गेल्या दहा महिन्यापासून बंद असलेल्या इयत्ता ५ ते ८ वी पर्यंतच्या बुलडाणा जिल्ह्यातील १ हजार ५९५ शाळांची घंटा आज बुधवारी २७ जानेवारीला शासनाच्या आदेशाने वाजल्या. शाळा उघळण्याच्या पहिल्याच दिवशी ३४ टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.

बुलडाण्यात १० महिन्यानंतर वाजली घंटा
बुलडाण्यात १० महिन्यानंतर वाजली घंटा
author img

By

Published : Jan 27, 2021, 10:32 PM IST

Updated : Jan 28, 2021, 5:52 AM IST

बुलडाणा - कोरोना आजाराने गेल्या दहा महिन्यापासून बंद असलेल्या इयत्ता ५ ते ८ वी पर्यंतच्या बुलडाणा जिल्ह्यातील १ हजार ५९५ शाळांची घंटा आज बुधवारी २७ जानेवारीला शासनाच्या आदेशाने वाजल्या. शाळा उघळण्याच्या पहिल्याच दिवशी ३४ टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. शाळा उघण्याचा आनंद विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर दिसत होता. दरम्यान शाळेत सॅनिटायझर,सोशल डिस्टन्सिंग,मास्क विना प्रवेश नाही, अशा अनेक खबरदारी शाळांनी घेतल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त करत केले त्याचबरोबर सर्वांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे आवाहनही केले.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश होते. आता कोरोनाचा धोका कमी झाल्याने व वर्ग ९ ते १२ वी चे वर्ग सुरळीतपणे सुरू असल्याने ५ ते ८ वीचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. आज शाळेचा पहिला दिवस असल्याने जिल्ह्यात 1 लाख ८८ हजार १४५ विद्यार्थी असून अंदाजे ३४ टक्केच विद्यार्थी शाळेत आले अशी माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

बुलडाण्यात १० महिन्यानंतर वाजली घंटा.
शाळेत सॅनिटायझेशन करून स्वच्छतेकडे लक्ष-
शाळांचे सॅनिटायझेशन करण्यात आले असुन शाळांमधील स्वच्छतेकडेही संस्थाचालकांनी परीपुर्ण लक्ष दिल्याचे स्पॉटवरुन लक्षात आले. याउपरही शिक्षकांच्या कोरोना विषयक आरटीपीसीआर चाचण्या पुर्ण झाल्यानंतर शिक्षकही विद्यार्थ्यांसमोर शिकवण्यासाठी उभे राहिले आहे.
पालकांनी व्यक्त केले समाधान-
जिल्हयात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे.एक लाखापेक्षा अधिक तपासण्या जिल्ह्यात झाल्या असून कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी आहे. मृत्यूची संख्याही कमीच आहे. तरीही पालकांची संमती असल्याशिवाय पाल्यांना शाळेत प्रवेश दिला जात नाही. शाळेच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांना मास्क लावण्याच्या सुचना व हातावर सॅनिटायर दिल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. ही खबरदारी शाळेत पालकांनी पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे आवाहनही पालकांनी केले आहे.
झिगझॅग पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण-
शिक्षण विभागाच्या जिल्ह्यातील सर्व शाळांना भेटी देवून त्याठिकाणची व्यवस्था पाहून विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सुचना देण्यात आल्या आहे. यावेळी उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. बुलडाणा वृंदा कुळकर्णी यांनी बुलडाणा येथील शाळांना भेटी दिल्या. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वत:च्या वस्तुंचा स्वत:च वापर करावा, तोंडाला मास्क लावणे, पिण्याच्या पाण्याची बॉटल, सॅनिटायझर करणे, सोशल डिस्टंसींगचा वापर करणे अशा महत्वाच्या सुचना दिल्या. तर शाळांमध्ये जस-जशी विद्यार्थ्यांच्यासंख्येत वाढ होईल, तसे शाळेचे नियमही बदलतील. यामध्ये झिगझॅग पध्दतीने जसे की, एक दिवस मुलांचा वर्ग होईल तर मुली घरी राहुन जे वर्गात शिक्षक शिकवत आहे ते लिंकद्वरे आॅनलाई वर्ग करतील. तर दुसऱ्या दिवशी मुलींचा वर्ग होईल,अशी माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

Last Updated : Jan 28, 2021, 5:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.