ETV Bharat / state

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर जातीय तणाव निर्माण करण्याचा आरोप; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार. - uddhav thackeray

सोमवारी १३ एप्रिल रोजी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या फेसबुक अकाऊंट वरून सकाळी ११ वाजता लाईव्ह केले त्यात त्यांनी दिल्ली मरकझ या ठिकाणाहून जिल्ह्यात कोरोना रोग आल्याचे सांगत महाराष्ट्राला आजपर्यंत ४० हजार कोटींचे महसुली नुकसान या समाजामुळे झाले, असे म्हटल्याचा आरोप सैय्यद जुनेद यांनी केलाय.

sayyad junaid said sanjay gaikwad speech reaised communal tension
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर जातीय तणाव निर्माण करण्याचा आरोप; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे तक्रार.
author img

By

Published : Apr 17, 2020, 7:54 AM IST

बुलडाणा:- जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या कडून सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकण्यात येणाऱ्या व्हिडिओच्या मार्फत एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप करीत आमदार संजय गायकवाड यांना असे भाष्य करण्यापासून थांबवावे अशी ताकीद देण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना बुलडाणा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सैय्यद जुनेद डोंगरे यांनी एका विनंती अर्जाद्वारे तक्रार केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडून काही शिकून घेण्याचा सल्लाही गायकवाड यांना सैय्यद जुनेद यांनी दिला आहे. या संकटाच्या काळात उध्दव ठाकरे स्वतः सगळ्यांना सोबत घेऊन चालत असून समजवून सांगत आहेत ते सर्व मुख्यमंत्र्यापैकी लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे सैय्यद जुनेद यांनी सांगितले आहे. संजय गायकवाड यांनी अनेक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले आहेत. त्यामध्ये त्यांनी दिल्ली मरकझवर भाष्य केले आहे.

सोमवारी १३ एप्रिल रोजी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या फेसबुक अकाऊंट वरून सकाळी ११ वाजता लाईव्ह केले त्यात त्यांनी दिल्ली मरकझ या ठिकाणाहून जिल्ह्यात कोरोना रोग आल्याचे सांगत महाराष्ट्राला आजपर्यंत ४० हजार कोटींचे महसुली नुकसान या समाजामुळे झाले. बुलडाण्यात कोरोनाचे सर्व रुग्ण हे मरकझचे आहेत, हे विधान खोटे आहे कारण पाहिले ५ रुग्ण हे मरकझचे नाहीत. गायकवाड यांच्याजवळ कोणताही सबळ पुरावा नसतांनाही त्यांनी बुलडाणा अतारी येथे हजारो मुसलमान नमाजचे पठण करतात हे खोटे विधान करून जिल्हा पोलीस व्यवस्थेवर ही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.या समाजाला आता कडक हिंदुत्व दाखवायची आवश्यकता आहे. असे चिथावाणी खोर व्यक्तव्य केल्याचा आरोप सैय्यद जुनेद यांनी केला आहे.

जी घटना चिखली मतदारसंघात घडली त्याचे उदाहरण देत मतदारसंघात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण जनतेला कायदा हातात घेऊन गावठी दारू स्वत:नष्ट करण्याचा सल्ला देखील संजय गायकवाड यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये दिला आहे. म्हणून आपणास विनंती आहे कि, सदर घटनेची चौकशी करून जनतेला विश्वास करून द्यावा की हे महाविकास आघाडी चे सरकार असून सदरहू आमदार यांना राजधर्माचे पालन करावे, आक्षेपार्ह व खोटी विधान ने करता सामाजिक बांधिलकी कायम राहावी याचा प्रयत्न करावा व स्वत: याची शाश्वती द्यावी असा सूचना संजय गायकवाड यांना द्याव्यात अशा आशयाचा विनंती अर्ज बुलडाणा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सैय्यद जुनेद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे इमेलद्वारे केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.