बुलडाणा: विशेष बाब म्हणजे प्रतीक आणि प्राजक्ता देशमुख यांचे शिक्षण शेगाव येथील गजानन महाराज कॉलेजला पूर्ण झाले आहे. त्यामुळे आज सातासमुद्रा पार देखील गणगणात बोतेचा गजर दिसून आला आहे. त्याचे क्षणचित्र त्यांनी थेट अमेरिकेतून आपल्या सोबत शेअर केले आहे. त्यामुळे गजाननाचा जय जयकार सातासमुद्रापार पाहायला मिळाला आहे.
श्रींचा प्रगट दिन थेट अमेरिकेतून: विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत नगरी शेगावात आज गजानन महाराज यांचा 145 वा प्रकट दिन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. यासाठी मोठ्या संख्येत भाविक शेगाव नगरीमध्ये दाखल झाले आहेत. शेगाव नगरीत गजानन भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून असंख्य भाविक संत नगरी शेगाव मध्ये दाखल झाले आहेत. संतनगरी शेगावात पायी दिंड्या देखील गेल्या आठ दिवसापासून दाखल होत आहेत. गण गण गणात बोतेच्या गजरात या पाय दिंड्या संत नगरी शेगावात दाखल झाल्या आहेत. आज शेगाव गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त मोठा प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
लाखो भाविक संतनगरीमध्ये दाखल: श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये दर्शन बारीत श्री गजानन महाराजांचे नाम स्मरण करीत भाविक शिस्तीत व शांततेत समाधीचे दर्शन घेत आहेत. आज श्रींचा 145 वा प्रगट दिन सोहळा सहभागी होण्यासाठी संत नगरीमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. गावागावाचे भावी पायदळ करत शेगावला पोहोचले असून प्रगट दिनाचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांना ओढ लागलेली दिसून येते. धरा पाऊलांनो शेगावाची वाट देवरूप घेऊन आले गजानन स्वामी झाले असे भाविक आपल्या नाम स्मरणात म्हणत आहेत. आतापर्यंत शेकडो भजनी दिंड्यांची हजेरी संतनगरीत लागली आहे. आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून दुपारी श्रींच्या रजत मुखवट्याची पालखी नगर परिक्रमा करता निघणार आहे. संपूर्ण मंदिर परिसरात गर्दीचे नियोजन करण्याकरिता स्वयंसेवक शिस्तबद्ध पद्धतीने सेवा देत आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता मागील 24 तासापासून मंदिर हे भाविकांच्या दर्शनाकरिता खुले करण्यात आले आहे.
हेही वाचा : Valentine Day : 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त बाजारात गुलाबांची मोठ्या प्रमाणात मागणी; दरात विक्रमी वाढ