ETV Bharat / state

बुलडाण्यात अवैध तिकीट बुकिंग सेंटरवर आरपीएफ दलाचा छापा - buldana news

शहरातील स्टेट बँकेच्या पाठीमागे असलेल्या ड्रीमव्हॅली मल्टीसर्व्हिसेस मध्ये अवैध स्वरूपात तिकिटांची बुकिंग करून ग्राहकांची लूट होत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ आणि मलकापूर रेल्वे सुरक्षा ( आरपीएफ) दलाला मिळाली होती.

बुलडाण्यात अवैध तिकीट बुकिंग सेंटरवर आरपीएफ दलाचा छापा
author img

By

Published : Oct 27, 2019, 6:12 PM IST

बुलडाणा - शहरातील ड्रीम व्हॅली मल्टीसर्व्हिसेस या अवैध तिकीट बुकिंग सेंटरवर शनिवारी (ता.२६) दुपारी भुसावळ, मलकापूर रेल्वे सुरक्षा (आरपीएफ) दलाने बुलडाणा शहर पोलिसांच्या मदतीने छापा मारला आहे. यावेळी शेकडो बुकिंग असलेल्या रेल्वे तिकीटांसह आरोपीला ताब्यात घेतले असून कॉम्पुटर, प्रिंटर, 2 मोबाईलही जप्त केले आहेत. सुनील गुलाबराव वाघ असे आरोपीचे नाव असून तो एकता नगर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागाची आय. आर. सी. टी. सी.च्या वेबसाईटवरून आरोपी सुनील वाघ साईटला हॅक करून कितीही आणि कोणतेही निश्चित (कंन्फर्म) तिकीट काढत होता. ही बाब रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकशीत समोर आली आहे. मात्र, या संदर्भात रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

बुलडाण्यात अवैध तिकीट बुकिंग सेंटरवर आरपीएफ दलाचा छापा

हेही वाचा - नांदेड : 'त्या' सराफा व्यापाऱ्याची हत्या पूर्ववैमनस्यातून?...

ऐन दिवाळीत तिकिट फुल्ल असल्याचे भासवून निश्चित (कंन्फर्म) तिकीटांची जास्त दराने विक्री करून ग्राहकांची लूट करण्यात येत आहे. शहरातील स्टेट बँकेच्या पाठीमागे असलेल्या ड्रीमव्हॅली मल्टीसर्व्हिसेस मध्ये अवैध स्वरूपात तिकिटांची बुकिंग करून ग्राहकांची लूट होत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ आणि मलकापूर रेल्वे सुरक्षा (आरपीएफ) दलाला मिळाली होती. या माहितीवरून छापा मारला असता ड्रीमव्हॅली मल्टीसर्व्हिसेसचा मालक सुनील गुलाबराव वाघ याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याच्याकडून पुढील दिवसांची शेकडो निश्चित (कंन्फर्म) तिकीटे आढळून आली.

हेही वाचा - तलवारीच्या धाकेवर आईस्क्रीम विक्रेत्याला लुटणाऱ्या निग्रो नागरिकाला अटक

विशेष म्हणजे आय. आर. सी. टी. सीच्या वेबसाईटवरून एका वेळी 4 ते 5 तिकीट बुक करण्याची सुविधा असतानाही सुनील साईटला हॅक करून कतीही आणि कोणतेही तिकीट कंन्फर्म काढत होता. आरोपी सुनील वाघ याला ताब्यात घेवून तिकीट सेंटरवरून कॉम्पुटर, प्रिंटर, 2 मोबाईल जप्त केले आहे. प्रकरणी आरपीएफ पथकाने आरोपी विरोधात 1989 रेल्वे अधिनियमच्या कलम 143 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात रेल्वे बुकिंग विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा संबंध आहे का? यासंदर्भात चौकशी सुरू आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक सुरक्षा आयुक्त राजेश दीक्षित याच्या पथकातील निरीक्षक राजेश बनकर, उपनिरीक्षक आर के सिंग, सी एस सातपुते, प्रधान आरक्षक नितीन लोखंडे, आरक्षक शेख नावेद, प्रमोद ढोले, सुजित यादव, संतोष यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली. सोबतच बुलडाणा शहर पोलीस निरीक्षक शिवाजी कांबडे यांच्या आदेशाने पोलीस शिपाई दत्ता नागरे, संदीप कायंदे हे ही या कारवाईत सहभागी होते.

Intro:Body:बुलडाणा:- सणासुदीच्या दिवसात रेल्वे तिकिटांची मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने जास्त दराने विक्री होत असून बुलडाण्यातील ड्रीमव्हॅली मल्टिसर्व्हिसेस या अवैध तिकीट बुकिंग सेंटरवर शनिवारी 26 ऑक्टोबरच्या दुपारी भुसावळ,मलकापूर रेल्वे सुरक्षा बळ (आरपीएफ) दलाने बुलडाणा शहर पोलिसांच्या मदतीने छापमारुन शेकडो बुकिंग असलेले रेल्वे तिकीटसह आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्या सेंटरवरून कॉम्पुटर, प्रिंटर,2 मोबाईल नेटसेटर जप्त केले.आरोपीचे नाव सुनील गुलाबराव वाघ असे असून तो एकता नगर मधील राहणारा आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागाची आय. आर. सी. टी. सी.च्या वेबसाईटवरून एका वेळी 4 ते 5 तिकीट बुक करण्याची सुविधा असतांनाही आरोपी सुनील वाघ साईटला हॅक करून कितीही आणि कोणतेही तिकीट कंफॉर्म करून काढत होता.आय. आर. सी. टी. सी.च्या वेबसाईटवर त्याने अश्या अनेक आयड्या तयार करून तिकीट बुकिंग करत असल्याचे रेल्वे सुरक्षा बाळाच्या चॉकशीत समोर आलंय..मात्र या संदर्भात रेल्वे सुरक्षा बाळाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिले आहे..

ऐन दिवाळीच्या वेळी रेल्वेचे तिकिट फुल्ल असल्याचे भासवून कँफॉर्म तिकीटचे जास्त दराने पैसे वसूल करून ग्राहकांनी लूट सुरू आहे.अश्या प्रकारची लूट बुलडाणा शहरातील मुख्य स्टेट बँकेच्या पाठीमागे असलेले ड्रीमव्हॅली मल्टिसर्व्हिसेस मध्ये अवैध स्वरूपात तिकिटांची बुकिंग करून ग्राहकांची लूट होत असल्याची गोपनीय माहितीच्या आधारे भुसावळ,मलकापूर रेल्वे सुरक्षा बळ ( आरपीएफ) दलाने छापा मारला असता ड्रीमव्हॅली मल्टिसर्व्हिसेस मालक सुनील गुलाबराव वाघ यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून पुढील दिवसाचे कॅफॉर्म असलेले शेकडो तिकीट आढळून आले.विशेष म्हणजे रेल्वे विभागाची आय. आर. सी. टी. सी.च्या वेबसाईटवरून एका वेळी 4 ते 5 तिकीट बुक करण्याची सुविधा असतांनाही सुनील साईटला हॅक करून कतीही आणि कोणतेही तिकीट कंफॉर्म करून काढत होता.आय. आर. सी. टी. सी.च्या वेबसाईटवर त्याने अश्या अनेक आयड्या तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.आरोपी सुनील गुलाबराव वाघ यास ताब्यात घेवून त्याच्या सेंटरावरून कॉम्पुटर, प्रिंटर,2 मोबाईल नेटसेटर जप्त केले आहे.प्रकरणी आरपीएफ पथकाने आरोपी विरुद्ध अप नं.976 नुसार सन 1989 रेल्वे अधिनियम च्या कलम 143 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात रेल्वे बुकिंग विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्या संबंध आहे का?यासंदर्भात चॉकशी सुरू आहे.सदर कारवाई रेल्वे सुरक्षा बळ (आरपीएफ) चे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक सुरक्षा आयुक्त राजेश दीक्षित याच्या पथकातील निरीक्षक राजेश बनकर,उपनिरीक्षक आर के सिंग,सी एस सातपुते,प्रधान आरक्षक नितीन लोखंडे, आरक्षक शेख नावेद,प्रमोद ढोले,सुजित यादव,संतोष यादव यांच्या पथकाने केली यांच्या सोबत बुलडाणा शहर पोलीस निरीक्षक शिवाजी कांबडे यांच्या आदेशाने पोहेका. दत्ता नागरे,संदीप कायंदे यांनी सहभाग नोंदविला...

सूचना:- फोटो मध्ये ज्याच्या चेहऱ्यावर राउंड केले आहे.व्हिडीओ मध्ये त्याच्या चेहऱ्यावर राउंड करावे व त्याचे नाव म्हणून आरोपी सुनील वाघ असे टाकावे...

-वसीम शेख,बुलडाणा-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.