बुलढाणा - शेतकऱ्यांवरील संकटे कमी होताना दिसून येत नाहीत. एका शेतकऱ्याने पावसापासून कसेबसे सोयाबीन वाचवून शेतातील खोलीत ठेवले होते. मात्र, चोरट्यांनी आपले हाथ साफ करून घेतले आहेत. ही घटना खामगाव तालुक्यातील पारखेड शिवारात घडली.
हेही वाचा - काँग्रेसच्या आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न, म्हणून आमदार गेले जयपूरला
जवळपास 20 टन सोयाबीन चोरून नेल्याचा अंदाज असल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्याने सांगितले. या प्रकरणी शेतकरी लक्ष्मण दयाराम सनासने यांनी खामगाव ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदवली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - मी फोनची वाट बघतोय, कुणी फोन करतच नाही - जितेंद्र आव्हाड