बुलडाणा - माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या साखर करखान्याला कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिल्याप्रकरणी बुलडाण्यातील बुलडाणा अर्बन मल्टिस्टेट शाखेच्या मुख शाखेत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक गेल्या तीन दिवसांपासून कर्जासाठी देण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताडणी करत आहे. यामुळे बुलडाण्यात एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाच्या पथकामध्ये 11 अधिकाऱ्यांचा समावेश असून सर्व अधिकारी हे परराज्यातील अधिकारी आहे. विशेष म्हणजे प्रामुख्याने राधेश्याम चांडक यांची कॅबीन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कॅबीनमध्ये हा अधिकारी वर्ग रेकॉर्डची तपासणी करत आहे. अन्य कोणाला तेथे जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे.
चार साखर कारखान्यांना दिलं कर्ज -
माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण हे सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहे. अशोक चव्हाण यांच्या सुभाष शुगर हदगाव, एम.व्ही.शुगर्स उमरी, भाऊराव शुगर 1 नांदेड, भाऊराव शुगर 2 नांदेड या साखर कारखान्यांना कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुलडाणा अर्बन मल्टिस्टेट पतसंस्थेकडून दिलेले आहे. या कर्ज प्रकरणात दाखल केलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी आयकर विभागाच्या 11 अधिकाऱ्यांचे पथक बुधवारी 27 ऑक्टोबरच्या सकाळी बुलडाणा अर्बन मल्टिस्टेट पतसंस्थेच्या मुख्य शाखेत दाखल होवून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.आज 29 ऑक्टोबरला ही तपासणी सुरू आहे. म्हणजे प्रामुख्याने राधेश्याम चांडक यांची कॅबीन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कॅबीनमध्ये हा अधिकारी वर्ग रेकॉर्डची तपासणी करत आहे. अन्य कोणाला तेथे जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. व शाखेच्या बाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.