बुलडाणा - बुलडाणा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करत भाजपचे योगेंद्र गोडे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. गोडे यांनी त्यांच्या प्रचार बॅनरवर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे फोटो टाकले होते. तसेच सबका साथ, सबका विकास ही भाजपची टॅगलाईन वापरली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली.
हेही वाचा - विकासासाठी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, खडसेंची खदखद
यावरून बुलडाण्यात खरंच भाजप-शिवसेना युती धर्म पाळला जात आहे का? की बंडखोर उमेदवाराला भाजपकडून अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जात आहे. अशी बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केली होती, याची दखल घेत अखेर भारतीय जनता पक्षाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनी भाजपाचा आधार घेण्याचा प्रयत्न करून मतदारांत संभ्रम निर्माण केल्याच्या कारणावरून अपक्ष उमेदवार योगेंद्र गोडेंवर कार्यवाहीसाठी तक्रार दाखल केली. यावरून योगेंद्र गोडे यांनी कार्यवाहीची धास्ती घेत भाजप नेत्यांचे फोटो असलेले बॅनर काढले आहे.