बुलडाणा - सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी चार दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाल राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr Rajendra Shingne) यांच्या मध्यस्थीने स्थगित केल्याची घोषणा आज शनिवारी केली.
प्रकृती ढासळल्याने तुपकर रुग्णालयात दाखल -
डॉ. शिगणेंनी सकाळीच आंदोलनस्थळी भेट देऊन रविकांत तुपकरांची तब्बेतची विचारपूस केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुपकरांच्या मागण्यासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत येत्या बुधवारी 24 नोव्हेंबर रोजी मंत्रालयात बैठक घेतल्या जाईल व केंद्राकडील मागण्या संदर्भात राज्य शासनाकडून पाठपुरावा केल्या जाईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मोबाईलद्वारे केंद्र सरकारमधील शेतकऱ्यांसाठी ज्या मागण्या आहेत. त्यावर सकारात्मक पद्धतीने विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी तुपकरांनी प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती (Ravikant Tupkar Admit In Hospital) करण्यात आले आहे.
आंदोलनात हे होत्या प्रमुख मागण्या -
सोयाबीन चे प्रति क्वि. दर 8 हजार रुपये व कापसाचा दर प्रति क्वि.12 हजार रुपये स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे, पाम तेलावरचा आयात कर पूर्वीप्रमाणे ३०% करण्यात यावा, सोयाबीनवर लागू असलेला जीएसटी हटवण्यात यावा, छोट्या व्यापाऱ्यांवरील स्टॉक लिमिट उठण्यात यावे, कापणी पश्चात नुकसानीच्या संदर्भातले तारखेचे घोळ न घालता महाराष्ट्राच्या कृषी खात्यानुसार विम्याची रक्कम मंजूर करावी आणि राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना हे. 50 हजार रुपये मदत तत्काळ द्यावी. तसेच कृषिपंपाचे वीज कनेक्शन कापणे थांबवावे, अशा मागण्या तुपकर (Demand Of Ravikant Tupkar) यांनी केल्या होत्या.
हेही वाचा - कर्तव्यावर असताना महिला वनरक्षकावर वाघाचा हल्ल्ला, महिलेचा मृत्यू; ताडोबातील घटना