ETV Bharat / state

विकास करा, मगच मतदान करू...रत्नापूर गावातील मतदान केंद्रावर शून्य टक्के मतदान - मतदान बहिष्कार

गावात घरकुल योजना नाही तसेच रस्तेही नाहीत. लग्न व इतर समारंभासाठी सभागृह नाही. पाण्याची सुविधा नाही. साधी अंगणवाडी नसल्याने लहान मुलांना रस्त्यावर बसावे लागते. हे सरकार व प्रशासन झोपलेले आहे.

निवडणुकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार
author img

By

Published : Apr 18, 2019, 6:33 PM IST

बुलडाणा - मुलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील रत्नापुर गावाने आज मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावातील मतदान केंद्रावर एकही मतदार आज फिरकला नाही. विकास करा, त्याशिवाय मतदान करणारच नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे देशभरात लोकशाहीचा उत्सव म्हणून मतदान केले जात असताना, रत्नापुरात शून्य टक्के मतदान झाले आहे.

रत्नापुर गावाने मतदानावर संपूर्णपणे बहिष्कार घातला आहे. तर ३५८ मतदान असलेल्या या मतदान केंद्रावर स्मशानशांतता पसरली आहे.
विशेष म्हणजे मेहकर तालुक्यातील आणि विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचा बालेकिल्ला अशी रत्नापूरची ओळख आहे. आदिवासी बहुल असलेल्या गावात स्वातंत्र्य मिळाल्यापासून मूलभूत सुविधादेखील मिळाल्या नाहीत. एक महिन्यापूर्वी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा दिला होता. तरीही सरकारी आणि प्रशासकीय पातळीवरून प्रभावी पावले उचलण्यात आली नाहीत. जोपर्यंत गावाला सुविधा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत मतदान करणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

निवडणुकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार

ग्रामस्थ गणेश टाले म्हणाले की, गावाचा विकास झाला नाही. मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय विकास होणार नाही, अशी ग्रामस्थांची धारणा झाली आहे. तरीही खासदार, खासदारांनी गावाकडे ढुंकून पाहिले नाही. गावात घरकुल योजना नाही तसेच रस्तेही नाहीत. लग्न व इतर समारंभासाठी सभागृह नाही. पाण्याची सुविधा नाही. साधी अंगणवाडी नसल्याने लहान मुलांना रस्त्यावर बसावे लागते. हे सरकार व प्रशासन झोपलेले आहे. त्यामुळे पंचायत, विधानसभा, जिल्हा परिषद अशा सर्वच निवडणुकांवर बहिष्कार राहणार आहे. गावात कोणताच विकास नसल्याचे प्रकाश शिंदे यांनी सांगितले. गावातील मतदा नाची टक्केवारी शून्य असल्याचा दुजोरा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मत मागणारे राजकीय पक्ष, नेते आणि मतदान केंद्रासाठी राबणारी प्रशासन यंत्रणा ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.

Intro:Body:स्टोरी :- रत्नापुर गावचा मतदानावरील बहिष्कार कायम....

शासन प्रशासन गावकऱ्यांची मनधरणी करण्यास उदासीन...

मतदान केंद्रावर स्मशान शांतता...केंद्रावर एकही गावकरी फिरकला नाही...

मतदान केंद्रावर 358 मतदान...

अँकर :- बुलडाणा लोकसभेसाठी एकीकडे मोठया उत्साहात मतदान होत असताना मात्र दुसरीकडे आपल्या मूलभूत सुविधा अभावी रत्नापुर गावाने मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घातलाय...तर 358 मतदान असलेल्या या मतदान केंद्रावर स्मशान शांतता पसरलेली असून सकाळ पासून या केंद्रावर एकही मतदार फिरकला नसल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्ह्यात घडलाय

वी वो :- मेहकर तालुक्यातील आणि विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचा बालेकिल्ला असलेल्या रत्नापुर या संपूर्ण आदिवासी असलेल्या गावात स्वातंत्र्य मिळाल्या पासून मूलभूत सुविधा देखील मिळाल्या नसल्याने एक महिना आधी गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना एक निवेदनाद्वारे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याने कळविण्यात आले होते , तरी सुद्धा या गावकऱ्यांची मनधरणी करून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यास शासन प्रशासन उदासीन ठरलंय...
तर मतदार संघातील एकही उमेदवाराला या गावाला भेट देऊन त्यांना मूलभूत सुविधांचे आश्वासन देणे देखील महत्वाचे वाटले नाही... तर जोपर्यंत गावाला सुविधा उपलब्ध होत नाही तो पर्यंत एकही निवडणुकीसाठी मतदान करणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

बाईट :- गावकरी,अधिकारी

-वसीम शेख,बुलडाणा-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.