बुलडाणा- कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी राज्य सरकार योग्य तपास करत होती. मात्र, केंद्र सरकारने राज्य शासनाची कुठलीही परवानगी न घेता हा तपास एनआयएकडे दिला हे दुर्दैवाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. ते नियोजन समितीच्या जिल्हा आराखडा बैठकी नंतर पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा- अर्थसंकल्प २०२० : व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिक सवलत देण्यावरून गोंधळ
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाचा तपास राज्य सरकार करत असतानाच राज्य सरकारची परवानगी न घेता हा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे सोपविला आहे. डॉ. शिंगणे म्हणाले की, राज्य शासन योग्य त्या पद्धतीने तपास करत होते. राज्य शासनाच्या तपासामध्ये कोणतीही शंका नव्हती. परंतु, मधातच केंद्र शासनाने यात हस्तक्षेप करून हा तपास राज्य शासनाकडून एनआयएकडे दिला. या तपासात काही कमतरता होती तर ती राज्याच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे होती. मात्र, तसे झाले नाही हे दुर्दैवाची बाब आहे.