शेगांव (बुलडाणा) - येथील रेल्वेस्थानकाच्या बाजूला मुंबईवरून येणाऱ्या हावडामेल समोर एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली. कैलास हरिभाऊ धुळे (वय - 42, रा. रेल्वे कॉलनी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना रविवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली.
कैलास हे येथील रेल्वे विभागात गैंगमन कार्यरत होते. या घटनेने रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - रायगड : वेळेवर उपचार अन रुग्णवाहिका न मिळाल्याने जखमी व्यक्तीचा मृत्यू
तर कैलास यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आली नाही. पुढील तपास शेगांव रेल्वे पोलीस करत आहे. कैलास यांच्या पश्चात पती आणि दोन मुले आहेत.