बुलडाणा - जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा विविध ठिकाणी निषेध होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीही हल्ला करणाऱ्या गुंडांचा निषेध केला आहे. मात्र, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निवेदन घेण्यासाठी कोणीही आले नाही. त्यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर निवेदन चिटकवले.
हेही वाचा - फ्री काश्मिर' बाबत समोर आले स्पष्टीकरण; हा फलक काश्मीरमुक्तीसाठी नव्हे, तर...
जेएनयूतील विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी घेऊन काही विद्यार्थी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले होते. मात्र, त्यांचे निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी आले नाहीत. इतर कोणी जबाबदार अधिकारी देखील आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासनाचाही निषेध व्यक्त केला.