ETV Bharat / state

२५ वर्षांपासून पिंपळखुटा गावाची वाट बिकट; आमदारांचे 'चैनसुख' उडवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार - Maharashtra assembly election 2019

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मात्र, अनेक गावे आजही विकासापासून कोसो दूर आहेत. त्यासाठी ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्कार टाकत असतात. मात्र, त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही. अशाच ग्रामस्थांचा आवाज त्यांच्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही 'मत द्यायचंय, पण कोणाला?' ही मालिका राबतोय. या मालिकेतील 'ही' तिसरी कहाणी...

पिंपळखुटावासियांचा मतदानावर बहिष्कार
author img

By

Published : Sep 24, 2019, 7:31 AM IST

Updated : Sep 24, 2019, 9:24 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात पिंपळखुटा (महादेव) येथे नदीवरील कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. अनेकदा त्यांनी मोठा पूल बांधून देण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडे केली. मात्र, अद्यापही त्यांना पूल मिळालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.

२५ वर्षांपासून पिंपळखुटा गावाची वाट बिकट; आमदारांचे 'चैनसुख' उडवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

२५ वर्षांपासून आमदार चैनसुख संचेतींची सत्ता -
मलकापूर तालुक्यात पिंपळखुटा (महादेव) हे तिर्थक्षेत्र आहे. बोदवड तालुक्यातून येणारी देव नदी आणि मोताळा तालुक्यातून येणाऱ्या व्याघ्रा नदीचा संगम पिंपळखुटा येथे झाला आहे. या संगमावर प्रभू श्री रामचंद्रांनी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली होती. त्यामुळे या गावाला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. याच नदीच्या तिरावर पिंपळखुटा (महादेव) गाव वसलेले आहे. गावाची लोकसंख्या जवळपास १ हजाराच्या घरात आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पिंपळखुळा (महादेव) गाव येते. या मतदारसंघावर गेल्या २५ वर्षांपासून भाजप आमदार चैनसुख संचेती यांची सत्ता आहे. मात्र, आमदार चैनसुख यांनी पिंपळखुळा ग्रामस्थांना कधी विकासाचे सुख दिलेच नाही.

हे वाचलं का? - बसवराज पाटलांच्या मतदारसंघात गोटेवाडीवासियांची फरफट, आमदारांनी दाखविलाच नाही 'विकासा'चा रस्ता

विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ पावसाळ्यात नदीकाठावर अडकतात -
ग्रामस्थांना गावात कुठलीही सोय नसल्याने तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. विद्यार्थ्यांना शाळेसाठी सुद्धा मलकापूरला जावे लागते. त्यामध्ये नदीवर कमी उंचीचा पूल आहे. नदीवर संगम असल्यामुळे पावसाळ्यात या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. त्यामुळे अनेकदा ग्रामस्थांना नदीच्या तिरावर तासनतास ताटकळत बसावे लागते. गावातून २५ मुली शिक्षणासाठी मलकापूर येथे जातात. मात्र, पावसामुळे त्या नदीकाठावर अडकून पडतात. शेवटी ग्रामस्थ त्यांच्या सुरक्षेसाठी नदीच्या काठावर उभे राहत असतात. पूर ओसरल्यानंतर रात्री २ वाजता त्यांना घरी जाता येते. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

हे वाचलं का? - पेमरेवाडी मुलभूत सुविधांपासून वंचित; विकासासाठी भाजपवासी झालेले वैभव पिचड आता तरी लक्ष देतील का?

२० वर्षांपासून पुलाची मागणी प्रलंबित, आमदारांकडून फक्त आश्वासन -
गेल्या काही दिवसांपूर्वी पिंपळखुळा गावातीलच शंकरसिंग रामसिंग मोरे यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालत पुरातून मानवी साखळीच्या आधारे स्मशानभूमीत गेले होते. त्यानंतर देखील गावातीलच भगवानसिंग रामचंद्र मोरे यांचे निधन झाले. यावेळी ग्रामस्थांवर तीच परिस्थिती ओढवली. गेल्या २० वर्षांपासून ग्रामस्थांनी आमदार चैनसुख संचेती यांच्याकडे मोठा पूल बांधून देण्याची मागणी केली. मात्र, आमदार महोदयांनी प्रत्येक वेळी आश्वासनाशिवाय काहीही दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.

Intro:Body:बुलडाणा : अंत्यसंस्कारासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा महादेव गावातील ग्रामस्थांनी यंदाच्या 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नदीवरील मोठा पूल बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे..भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांच्या मतदार संघातील हा गांव आहे..

मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा महादेव येथे येथील गावातील ग्रामस्थ शंकरसिंग रामसिंग मोरे यांच्या अंत्यसंस्कारासाठी आपला जिव धोक्यात घालुन नदीला आलेल्या पुरातुन मानवी साखळी च्या आधारे जात असल्याचे विडीओ शोषल मिडीयावर वायरल झाले असतांना पुन्हा गावातील भगवानसिंग रामचंद्र मोरे यांचे निधन झाल्याने ग्रामस्थांना पुन्हा याच पुरातुन जीव धोक्यात घालून जावे लागल्याने ग्रामस्थांनी मोठा संताप व्यक्त करून विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय पिंपळखुट ग्रामस्थांनी घेतला.

मलकापुर तालुक्यात पिंपळखुटा(महादेव)हे तिर्थक्षेत्र असुन बोदवड तालुक्यातुन येणारी देव नदी व मोताळा तालुक्यातुन येणाऱ्या व्याघ्रा नदीचा संगम पिंपळखुटा येथे झाला असुन या संगमावर प्रभु श्री रामचंद्रांनी महादेवाच्या पिंडींची स्थापना केली असल्याने यास तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे याच नदीसंगम तिरावर पिंपळखुटा(महादेव) जवळपास एकहजार लोकवस्तीचे गाव वसलेले आहे या गावात दळणवळणासाठी आमदारांनी बांधलेल्या पुलाची ऊंची फारच कमी असल्याने पावसाळ्यात दरवर्षीच पुलावरून पाणी असल्याने ग्रामस्थांना,विद्यार्थ्यांना जिव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे.काही दिवसांपूर्वी ग्रामस्थ शंकरसिंग रामसिंग मोरे यांच्या अंत्यसंस्कारासाठी आपला जिव धोक्यात घालुन नदीला आलेल्या पुरातुन मानवी साखळी च्या आधारे जात असल्याचे विडीओ शोषल मिडीयावर वायरल झाले असतांना पुन्हा गावातील भगवानसिंग रामचंद्र मोरे यांचे निधन झाल्याने ग्रामस्थांना पुन्हा याच पुरातुन जीव धोक्यात घालून जावे लागल्याने आणि गावाला हा एकमेव रस्ता असल्याने त्या ठिकाणी नवीन पुलाची मागणी ग्रामस्थांनी गेल्या विस वर्षापासुन आमदार चैनसुख संचेती यांच्याकडे रेटून धरली मात्र प्रत्येक वेळी आश्वासन शिवाय काहीच ग्रामस्थां पदरात पडले नसल्याने व तिच जिवघेणी कसरत सुरू असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी 2019 च्या तर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय पिंपळखुटा(महादेव)ग्रामस्थांनी घेतला आहे...

बाईट:- ग्रामस्थ,पिंपळखुटा(महादेव)

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : Sep 24, 2019, 9:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.