ETV Bharat / state

साडेतीनशे किलोमीटर पायपीट करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची हाक; म्हणाले सरकारने आम्हाला घरी पोहोचवावे - बुलडाणा

नाशिकवरुन छत्तीसगडकडे जाण्यासाठी काही मजुरांनी पायी प्रवासाला सुरुवात केली आहे. तप्त उन्हात प्रत्येक दिवशी 40 ते 50 किलोमीटर प्रवास करत दहा दिवसात त्यांनी साडेतीनशे किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे.

dj
मजुरांशी संवाद साधताना प्रतिनिधी वसीम शेख
author img

By

Published : Apr 23, 2020, 7:31 PM IST

Updated : Apr 24, 2020, 11:49 AM IST

बुलडाणा - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जेवण्याची-राहण्याची व्यवस्था होत नसल्याने परप्रांतीय मजूरांनी आपल्या घराकडे कूच करून शेकडो किलोमीटर पायपीट करायला सुरुवात केली. स्थलांतराला सरकारने मनाई केल्यानंतरही मजुरांच्या लोंढ्यांना जिल्ह्याबाहेर सोडण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला आमच्या घरी पोहोचवून द्यावे अशी मागणी या मजुरांनी केली आहे.

साडेतीनशे किलोमीटर पायपीट करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची हाक; म्हणाले सरकारने आम्हाला घरी पोहोचवावे

नऊ मजुरांनी नाशिकवरुन छत्तीसगडकडे जाण्यासाठी पायी प्रवासाला सुरुवात केली आहे. तप्त उन्हात प्रत्येक दिवशी 40 ते 50 किलोमीटर प्रवास करत दहा दिवसात त्यांनी साडेतीनशे किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे. ते बुलडाण्याच्या बोथा फॉरेस्ट वन्यजीव अभरण्यात पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्याशी आमचे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी वसीम शेख यांनी बातचीत केली.

'आम्ही बांधकाम मजूर असून नाशिकमध्ये आमची राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था नसल्याने आम्ही गेल्या दहा दिवसापासून पायी प्रवास करत आहोत. जिल्ह्याच्या प्रत्येक सीमेवर विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या चेकपोस्टवरून आम्हाला न अडवता जाण्यासाठी परवानगी देण्यात आली' असे सांगितले. त्यांनी आम्हाला आमच्या घरी पोहोचवावे, अशी मागणीही सरकारकडे केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीयांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यासंदर्भात मागणी केलेली आहे.

Last Updated : Apr 24, 2020, 11:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.