बुलडाणा- नांदुराकडून खामगावकडे येत असताना पारखेड फाट्याजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी घडली. दामोदर सारंगधर अरबट (४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
दामोदर आपल्या क्र.(एम.एच २८ यू.२२५७) दुचाकीने मंगळवारी खामगाव-नांदुरा मार्गावरून जात होते. त्यादरम्यान पारखेड फाट्यानजिक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या घटनेत ते जबर जखमी झाले होते. दरम्यान त्याच मार्गावरून प्रवास करणारे आनंद कुलकर्णी यांना अरबट गंभीर अवस्थेत रस्त्यावर आढळले. त्यांनी अरबट यांना रुग्णवहिकेद्वारे खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच अरबट यांनी अखरेचा श्वास घेतला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी रामचंद्र बानाईत यांच्या तक्ररीनंतर अज्ञात वाहन चालकाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
हेही वाचा- लालचेपोटी स्वतःचे ४९ हजार रुपये गमावले, अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल