बुलडाणा - जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सोनाटी गावात अवकाळी पाऊस सुरू असताना वीज पडून एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. घटनेत शिवाजी किसन बदल यांचा जागीच मृत्यू झाला.
राजू मनु शिरे, विष्णू किसन गुंजकर, अंबादास दौलत कटारे, राम भगवान वाघमारे हे चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर मेहकारच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोनाटी येथील गावानजीक एका शेतामध्ये गावातील सहा लोक बसलेले होते. अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात होवून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. ज्या झाडाखाली हे लोक बसलेले होते त्याच झाडावर अचानक वीज पडली.