ETV Bharat / state

दोन लाखाच्या देशी-विदेशी दारूसह एकाला बुलडाण्यात अटक - buldana crime news in marathi

या धडक कारवाईमुळे अवैधरित्या दारुची वाहतूक व विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शरद तुळशीदास बोरकर (वय ३२) असे आहे.

foreign liquor in buldana
foreign liquor in buldana
author img

By

Published : Mar 14, 2021, 1:15 PM IST

बुलडाणा - विनापरवाना देशी व विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केले आहे. यावेळी त्याच्या ताब्यातून देशी विदेशी दारूसह दोन लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चिखली येथील शेगाव कचोरी सेंटरसमोर शुक्रवारी १२ मार्च रोजी करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे अवैधरित्या दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शरद तुळशीदास बोरकर (वय ३२) असे आहे.

चारचाकी वाहनातून वाहतूक

बुलडाणा जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करून त्याचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांना दिले होते. या आदेशावरून गिते यांनी एक पथक तयार केले. दरम्यान हे पथक चिखली तालुक्यात कार्यरत असताना एका चारचाकी वाहनामध्ये देशी व विदेशी दारूची वाहतक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली.

२ लाख ४ हजार २४० रुपयांचा माल जप्त

या माहितीवरून पथकाने चिखली येथील शेगाव कचोरी सेंटरसमोर सापळा रचला. काही वेळानंतर एम. एच. २० बी. एन. ३९१२ या क्रमांकाच्या कारला थांबवून पोलिसांनी झडत घेतली असता त्यामध्ये देशी व विदेशी दारूचा साठा आढळून आला. या कारमधून पोलीस पथकाने देशी विदेशी दारूचे दहा बॉक्स व कार असा एकूण २ लाख ४ हजार २४० रुपयाचा माल जप्त करून चिखली येथील आरोपी शरद तुळशीदास बोरकर वय ३२ यास अटक करण्यात आली आहे.

कारवाई पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्था. गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अताउल्ला खान, विजय सोनोने यांच्यासह चिखली पोलीस ठाण्याचे अंमलदार राजु सोनोने व गजानन जाधव यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.