बुलडाणा - संग्रामपूर तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, सरकारकडून अद्यापही या शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याने अखेर आज (29 ऑक्टोबर) भाजपच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी संग्रामपूर कृषी कार्यालयात ठिय्या मांडला होता.
बोलताना भाजप तालुकाध्यक्ष दोन महिन्यापूर्वी झालेल्या पावसामुळे मुग, उडीद, सोयाबीन, मका, ज्वारी हे पीक उद्धवस्त झाले होते. कपाशीलाही मोठा फटका बसला आहे. संग्रामपूर तहसीलात देखील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आपला खर्चही काढणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ मदत करावी यासाठी संग्रामपूर तालुका भाजप कडून वेळोवेळी मागणी करण्यात आली. मात्र, अजूनही सरकारने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत दिली नसल्याने संग्रामपूर तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शेतकरी व भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी तालुका कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - शेगाव-खामगाव रोडवर स्कॉर्पिओच्या धडकेत २ दुचाकीस्वार ठार; एक जखमी