ETV Bharat / state

वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन; सुटाळा येथे झाले अंत्यसंस्कार

author img

By

Published : Jul 18, 2019, 5:49 PM IST

अस्सल वऱ्हाडी लिखाणासाठी पुरुषोत्तम बोरकर प्रसिद्ध होते.ग्रामीण भागाचे वास्तव मांडणारी त्यांनी लिहलेली 'मेड इन इंडिया' ही कादंबरी चांगलीच गाजली.

पुरुषोत्तम बोरकर

बुलडाणा - सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी सुटाळा येथील त्यांच्या घरी रात्री आठ वाजता निधन झाले. बोरकर ६३ वर्षांचे होते, त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेक साहित्यिक, कलावंत, लेखक, पत्रकार उपस्थित होते.

पुरुषोत्तम बोरकर यांना मान्यवरांची श्रद्धांजली

आपल्या आगळ्यावेगळ्या अस्सल वऱ्हाडी लिखाणाच्या माध्यमातून ते प्रसिद्ध होते. ग्रामीण भागाचे वास्तव मांडणारी ' मेड इन इंडिया ' ही कादंबरी चांगलीच गाजली. या कादंबरीवर १९९० मध्ये नागपूर आकाशवाणीवर तीन महिने नाटकीय सादरीकरणही करण्यात आले.

'आमदार निवास १७५७', '१५ ऑगस्ट भागीला २६ जानेवारी' यासारख्या कांदबऱयांसह गझल, चरित्रात्मक लिखाण पुरुषोत्तम बोरकर यांनी केले. काही वृत्तपत्रांसाठी देखील त्यांनी लिखाण केले, त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेत.

काळाच्या पडद्याआड गेलेल्या या अस्सल वऱ्हाडी साहित्यिकाचे वऱ्हाडी भाषेच्या संवर्धनासाठीचे योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.

Intro:Body:बुलडाणा: - सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील सुटाळा येथील त्यांच्या घरी दुःखद निधन झाले ते ६३ वर्षांचे होते त्यांच्यावर आज अनेक साहित्यिक , कलावंत , लेखक , पत्रकार यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडलेत ....

आपल्या आगळ्यावेगळ्या अस्सल वऱ्हाडी लिखानाच्या माध्यमातून ते प्रसिद्ध होते , तर ग्रामीण भागाचे त्यांच्याच भाषेत वास्तव मांडणारी ' मेड इन इंडिया ' ही कादंबरी चांगलीच गाजली आणि याच कादंबरी वर १९९० मध्ये नागपूर आकाशवाणी वर तीन महिने नाटकीय सादरीकरणही करण्यात आले. "आमदार निवास १७५७ " , १५ ऑगस्ट भागीला २६ जानेवारी " यासारख्या कांदबरी सह गझल , चरित्रात्मह लिखाण त्यांनी केलय तर काही वृत्तपत्रासाठी देखील त्यांनी लिखाण केलंय, त्यांच्या लिखाणावर त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेत... पडद्या आड गेलेल्या अश्या या अस्सल वऱ्हाडी साहित्यिकाचे वऱ्हाडी भाषेच्या संवर्धनासाठी चे योगदान कायम स्मरणात राहील...अश्या भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्यात... मातीशी माळ जुळलेल्या या मराठमोळ्या व्यक्तिमत्वाला इटीव्ही भारत ची भावपूर्ण श्रद्धांजली.

बाईट -
१) पुरुषोत्तम खेडेकर (संस्थापक अध्यक्ष, मराठा सेवा संघ)
२) दिलीप देशपांडे (नाट्य कलावंत)
३) पि आर राजपूत (मित्र ,अमरावती)

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.