ETV Bharat / state

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने नातवाकडून आजीचा खून, बुलडाण्यातील घटना - खुरमपूर आजीचा खून

दारू पिण्यासाठी आजी पैस देत नसल्याने संतापलेल्या नामदेवने गुरुवारी विळ्याने आजीच्या गळ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात आजीचा जागीच मृत्यू झाला.

बुलडाणा
बुलडाणा
author img

By

Published : Sep 4, 2020, 4:22 PM IST

बुलडाणा - दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून नातवाने आपल्या ९० वर्षीय आजीचा विळ्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील खुरमपूर येथे गुरुवारी घडली आहे. नामदेव भावराव नागरे (वय ४०) असे त्या दारुड्या नातवाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

लक्ष्मीबाई लिंबाजी नागरे, असे मृत आजीचे नाव आहे. दारू पिण्यासाठी आजी पैस देत नसल्याने संतापलेल्या नामदेवने गुरुवारी विळ्याने आजीच्या गळ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात आजीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती सरपंचांनी लोणार पोलिसांना दिली. यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख, पो.हे.कॉ सुरेश काळे, लेखनीक चंद्रशेखर मूरडकर, पो.हे.कॉ बन्सी पवार, गोपनीय विभगाचे कैलास चतरकर पो.कॉ रवींद्र बोरे, चालक गजानन ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केला. आरोपी नातू नामदेव हा पळून जाण्याचा तयारीत असताना गावकऱ्यांच्या मदतीने मोठ्या शिताफीने त्याला अटक केली.

हेही वाचा - "माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करण्यास तयार; मात्र सरकारमधील मोठे मंत्री करतील का?"

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.