बुलढाणा : जिल्ह्यात हिंदू मुस्लिम एकतेचा अनोखा प्रयोग करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधव जनावरांची कुर्बानी करणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 29 जून रोजी हिंदू बांधवांची आषाढी एकादशी आणि त्याच दिवशी मुस्लिम बांधवांचा सण बकरी ईद येत असल्याने, बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधव जनावरांची कुर्बानी करणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन या निमित्ताने पाहायला मिळाले आहे.
13 तालुक्यात बकरी ईदला मुस्लिम समाजाने कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम बांधवांनी सर्वानुमते घेतलेली या निर्णयाचे स्वागत होत आहे.- सुनील कडासने, जिल्हा पोलिस अधीक्षक बुलढाणा
जनावरांची कुर्बानी करणार नाही : बुलढाणा जिल्हा पोलिसांकडून मुस्लिम बांधवांना आवाहन केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी या आवाहनाला योग्य प्रतिसाद दिला. त्यांनी आषाढी एकादशीनिमित्त जनावरांची कुर्बानी करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात सर्व तालुक्यात आणि गाव पातळीवर बकरी ईदला मुस्लिम बांधव जनावरांची कुर्बानी करणार नाही. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात हा आगळा वेगळा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.
निर्णयाचे स्वागत : येत्या 29 जून रोजी बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी कुर्बानी देऊन हा सण साजरा करतात. मात्र, हिंदू धर्मीयांची पवित्र आषाढी एकादशी याच दिवशी असल्याने या दिवशी कुर्बानी न देण्याचा स्तुत्य निर्णय बुलढाणा जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी सर्वांनी मते घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरातून केले जात आहे. बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्वच मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक मशीद व दर्गाचे विश्वस्त आणि मौलवींची बैठक घेतली. यावेळी उपस्थित मुस्लिम समाजाच्या प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून या दिवशी राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुत्व कायम राहण्यासाठी पुढाकार घेतला.
हेही वाचा :
- Bakri Eid kurbani : बकरी-ईदला कुर्बानीसाठी बकरे आणल्याने मिरा रोडमधील सोसायटीत राडा, 11 जणांविरोधात गुन्हा
- Ramzan Eid 2023: आशियातील सर्वात मोठ्या पशुवधगृहात बकरी ईदची तयारी सुरू; बसविण्यात येणार 300 सीसीटीव्ही कॅमेरे
- Ashadhi Ekadashi 2023: अनोखे हिंदु मुस्लिम ऐक्य, बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा 'या' गावात निर्णय