बुलडाणा - लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्यावतीने डॉ. राजेंद्र शिंगणे तर भाजप - शिवसेनेच्यावतीने प्रतापराव जाधव यांनी आपली उमेदवारी आज दाखल केली. अर्ज भरताना दोन्ही उमेदवारांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांनी विद्यमानखासदार प्रतापराव जाधव यांच्यावर कडाडून टीका केली. प्रतापरावांच्या १० वर्षाच्या काळात अनेक प्रकल्प रखडले असून निष्क्रिय खासदार म्हणून जिल्हात त्यांची ओळख झाली असल्याचे शिंगणे म्हणाले. तर प्रतापराव जाधव यांनी ही निवडणूक विकासाच्या मुद्यांवर लढली जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांना केंद्रस्थानी ठेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचे जाधव म्हणाले.