ETV Bharat / state

Supriya Sule on Jijau Birth Festival : जिजाऊ जन्मोत्सवावरून खासदार सुप्रिया सुळे यांची शिंदे, फडणवीस सरकारवर टीका - Fadnavis government

जिजाऊ जन्मोत्सवात ( Jijau birth festival ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आले असते, तर आनंद झाला असाता अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. त्या आज सिंदखेड राजा येथे मासाहेब जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी आल्या असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Jijau birth festival
मासाहेब जिजाऊ
author img

By

Published : Jan 12, 2023, 7:09 PM IST

खासदार सुप्रिया सुळे

बुलडाणा - बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज माँ जिजाऊंची ४२५ वी जयंती ( Jijau birth festival ) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात होत आहे. मासाहेब जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी सुप्रिया सुळे सिंदखेड राजा येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले असते तर बर वाटले असते अशी टीका त्यांनी शिंदे सरकारवर केली.

जनतेसाठी शिंदे सरकारकडे वेळ नाही - शिंदे फडणवीस सरकारकडे जनतेसाठी वेळ नसून ते त्यांच्या कामातच व्यस्त आहे अशी, टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. तसेच शिंदे फडणवीस सरकारला ईडी सरकार म्हटलेले आवडते असा हल्लाबोल त्यांनी शिंदे यांच्यावर केला.

शिंदे सरकारचे विकासकामांकडे दुर्लक्ष - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंहखेडराजा येथे येऊन येथील विकासकामांचा आराखडा तयार केला. मात्र, सहा महिन्यांपूर्वी सरकार गेल्यापासून ते काम रखडले आहे. सध्याच्या सरकारने विकास आराखड्याकडे दुर्लक्ष केल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी भुईकोट राजवाड्यात झाला होता. हा राजवाडा मुंबई-नागपूर महामार्गा जवळ असलेल्या सिंदखेड राजा येथे आहे. येथे राजे लखुजीराव जाधव यांची समाधी आहे. ही भव्य वस्तू भारतातील सर्व हिंदू राज्यांतील सर्व समाधीपेक्षा मोठी आहे. रंगमहाल हा जिजाऊंनी केलेला वाडा आहे. या राजवाड्यात शहाजी राजे तसेच जिजाऊंच्या लग्नाची बोलणी झाली होती.

8 व्या शतकातील प्राचीन मंदिर - भुईकोट राजवाड्यात नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात संपूर्णपणे दगडात कोरलेले हरिहराचे सुंदर शिल्प आहे. राजा लखुजीराव जाधव यांनी मंदिराच्या पुनरुज्जीवनावर एक शिलालेख कोरलेला आहे. या मंदिरासमोर चौकोनी आकाराचा बारवा असून पायथ्याकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. त्यानंतर हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे. जे 8 व्या ते 10 व्या शतकातील प्राचीन मंदिर असल्याची माहिती इतिहास संशोधकांनी दिली आहे.

हेही वाचा - Jijamata Jayanti 2023 : आज राजमाता जिजाऊ यांची जयंती ; सिंदखेडराजामध्ये सकाळपासून शिवभक्तांची गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.