ETV Bharat / state

बुलडाण्यात माय-लेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; मृतदेहाजवळ सापडली 'सुसाईड नोट' - खामगाव

बुलडाण्यात ५४ वर्षीय आईने आपल्या ३५ वर्षीय मुलीसोबत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

मृत शारदा रोठे (मुलगी)
author img

By

Published : Jun 5, 2019, 8:38 AM IST

बुलडाणा - खामगाव तालुक्यातील रोहणा येथे माय-लेकीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून सुनंदा नामदेव निमकडे आणि शारदा पुंडलिक रोठे, अशी मृतांची नावे आहेत.

सुनंदा या त्यांची मुलगी शारदा हिच्यासोबत तिच्या सासरी राहत होत्या. गेल्या ३ जूनपासून दोघीही सकाळपासून घरातून बेपत्ता होत्या. दोघीही दुपारपर्यंत घरी परत न आल्याने शारदाच्या नवऱयाचा मोठा भाऊ ज्ञानदेव त्यांना शोधण्यासाठी गेला. मात्र, कुठेही त्यांचा शोध लागला नाही. अखेर त्या गावातीलच एका विहिरीमधील पाण्यात मृत अवस्थेत तरंगताना दिसून आल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींचेही मृतदेह बाहेर काढले. यावेळी मृत शारदाजवळ एक चिठ्ठी सापडली.

घटनेबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी

जाणून घ्या काय लिहिलेय सुसाईड नोटमध्ये -

या माय-लेकीचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृत शारदाजवळ सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये तिघांची नावे आहेत. तसेच वडिलांनी शेती नावावर का केली नाही? असाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीच्या वादातून ही आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Intro:Body:बुलडाणा:- खामगाव तालुक्यातील रोहणा येथे माय-लेकीने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. मृतकांजवळून पोलिसांना
सुसाईड नोट सापडली असून प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविल्या जात आहे.

खांमगाव तालुक्यातील रोहणा येथे ५२ वर्षीय सुनंदा नामदेव निमकडे ही राहते तिच्या सोबत तिची ३४ वर्षीय मुलगी सौ.शारदा पुंडलिक रोठे हिच्यासोबत तिच्या सासरी राहत होती. सोमवारी ३ जून रोजी दोघी माय-लेकी सकाळपासून घरातून बेपत्ता झाल्या होत्या. दरम्यान दुपारपर्यंत दोघी घरी परत न आल्याने शारदाचा जेठ ज्ञानदेव दत्तजु रोठे हे शारदा व तिच्या आईचा शोध घेण्यासाठी गावात गेले. दरम्यान दोघी गावातील एका विहिरीमध्ये पाण्यात मृत अवस्थेत तरंगताना दिसून आल्या. घटनेची माहिती गावात पसरली. घटनेबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोघींचे मृतदेह विहिरीबाहेर काढले. यावेळी पोलिसांना मृतक सौ. शारदा हिच्याजवळ एक चिट्ठी सापडली असून त्यामध्ये तिघांची नावे नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांनी जेठ ज्ञानदेव रोठे यांच्या फिर्यादीवरून कलम १७४ जा.फौ नुसार मर्गची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.

बाईट:-रफिक शेक,ठाणेदार ग्रामीण पोलिस स्टेशन खामगाव

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.