बुलडाणा - मलकापूर येथे एका 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. भगवान संतोष भोपळे (वय 60) असे नराधमाचे नाव आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी मलकापूर शहरातून असंख्य महिलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
तसेच नराधम आरोपी भगवान भोपळे याला फाशी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीसाठी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात महिलांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले.
हेही वाचा - ठाण्यात रेशनकार्डची होळी करत नागरिकांचे आंदोलन; धान्याचा अपहार होत असल्याचा आरोप