ETV Bharat / state

मोबाइल दुकाने फोडणारा अट्टल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

चिखली शहरासह परिसरात मोबाइलची दुकाने फोडून त्यातील मोबाइल लंपास करणाऱ्या अट्टल चोरटयास पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला यश आले आहे.

author img

By

Published : Jun 9, 2021, 6:27 PM IST

मोबाईल दुकाने फोडणारा अट्टल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

बुलडाणा - चिखली शहरासह परिसरात मोबाइलची दुकाने फोडून त्यातील मोबाइल लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यास पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला यश आले आहे. यावेळी त्याच्या ताब्यातून सोळा हजार रुपये किंमतीचे आठ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई मंगळवारी ८ जून रोजी करण्यात आली आहे.

चोरट्याला अटक करण्यासाठी स्थापन करण्यात आले होते पथक -
मागील काही दिवसापासून चिखली शहरासह परिसरात मोबाइल दुकाने फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी चिखली पोलीसात मोबाइल दुकान फोडीचा एक गुन्हा दाखल असून या गुन्हयात चोरीस गेलेले वेगवेळ्या कंपनीचे ५ मोबाइल चोरुन नेणारा आरोपी संघर्ष उर्फ नक्या किशोर पवार (वय २१, रा. सिद्धार्थ नगर चिखली) हा फरार होता. दरम्यान पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या आदेशानुसार मोबाईल चोरीच्या घटनाना प्रतिबंध करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले होते.

चोरट्याला त्याच्या राहत्या घरून केले अटक
दरम्यान मंगळवारी 8 जून रोजी हे पथक पेट्रोलिंग करीत असताना आरोपी संघर्ष उर्फ नक्या किशोर पवार हा चिखलीतील सिध्दार्थ नगरमध्ये त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्याची विचारपुस केली असता त्याने मोबाइल चोरल्याची कबुली दिली. चोरी गेलेला माल व इतर ठिकाणाहून चोरुन आणलेले सोळा हजार रुपये किमतीचे आठ ८ मोबाइल जप्त करण्यात आले. त्यानंतर आरोपीस चिखली पोलीसांच्या हवाली करण्यात आले. सदर कारवाई पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंददमवार, पो.हे. कॉ गजानन अहेर, पो.कॉ. विजय सोनोने, गजानन गोरले व चालक सुधाकर बडे यांच्या पथकाने केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.