बुलडाणा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर 24 तास बंदोबस्त करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना विषाणुची बाधा होऊ नये, म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे बुलडाणा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी "मोबाईल सॅनिटायझेशन व्हॅन"ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या मध्ये 6 ते 7 सेकंद उभे राहील्यास संपूर्ण शरिराचे निर्जंतुकीकरण होते. बंदोबस्तावरील पोलिसांसाठी अशा प्रकारची सुविधा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बुलडाणा जिल्हा पोलीस दलामार्फत सुरू करण्यात आली आहे. याचा शुभारंभ आज (दि. 8 एप्रिल) अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
बुलडाणा पोलीस मोटार परिवहन विभागातील फोर्स मोटर्स लाईट बैन या वाहनाचा उपयोग सॅनिटायझेशन व्हॅनसाठी करण्यात आला. या वाहनामध्ये प्रेशर फॉगिंग सिस्टीम बसविण्यात आली असून वाहनाचे टपावर 750 लीटर क्षमतेच्या टाकीचा वापर या करण्यात आला आहे. या टाकीमध्ये निर्जंतुकीकरणासाठी वापरले जाणारे सोडिअम हायपोक्लोराईड सोल्युशन योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून पाईपद्वारे तुषार सिंचन सिस्टीमवारे गाडीच्या आतील भागात सोडण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यात ही मोबाईल सॅनिटायझेशन व्हॅन संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्जंतुकीकरणासाठी फिरणार आहे.
हेही वाचा -EXCLUSIVE : निजामुद्दीनमधील संपूर्ण माहिती पोलिसांना होती, मरकझमधील उपस्थितासोबत खास बातचीत