बुलडाणा Mehkar Toll Booth Closed : मेहकर समृद्धी महामार्ग येथील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. त्यांना दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. दिवाळीत पगार होईल, अशी अपेक्षा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना होती. परंतु रोडवेज कंपनीनं पगार दिला नाही. याकरता टोलनाका कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आज टोलनाका बंद केला. या टोलनाक्यावरून जाणाऱ्या सर्व गाडी मालकांनी टोलचा दांडा बाजूला करून टोल न भरता गाड्या पुढे नेल्या; मात्र कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही. (Mehkar Toll Booth Employee Agitation)
यामुळे पीएफ नाही : यापूर्वी फास्ट गो कंपनीनं पहिले मेहकर-फर्दापूर टोलनाका चालवण्यासाठी घेतला होता. यांनी कर्मचाऱ्यांचे पीएफ न देता कंपनी सोडून गेली. यानंतर रोडवेज सोल्युशन कंपनीला समृद्धी फरदापूर टोलनाका चालवण्यासाठी दिला. रोडवेज सोल्युशन कंपनीनंसुद्धा या मुलांचा पीएफ न देता दोन महिन्यांचा पगारसुद्धा दिला नाही. जेव्हापासून टोलनाका सुरू झाला आहे, तेव्हापासून कर्मचाऱ्यांना पगार पत्र दिलेलं नाही. पगार पत्र नसल्या कारणानं पीएफसुद्धा मिळत नाही. दर तीन महिन्याला कंपनी बदलत राहिली तर कोणती कंपनी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पीएफ देणार असा सवाल उपस्थित होत आहे.
टोलनाका कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी : टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करीत टोल मोफत केला आहे. जोपर्यंत पगार आणि पीएफ मिळत नाही तोपर्यंत कर्मचारी टोल नाक्यावर आंदोलन करत सर्व वाहने मोफत सोडत राहणार अशी भूमिका घेतली आहे. नेहमी शासन प्रत्येकाला रोजगार, प्रत्येकाला नियमित वेतन आणि प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी याकरिता मोठी वर्गणी करते; पण हा महामार्ग जेव्हापासून सुरू झाला आहे एक ना अनेक याबाबतचे किस्से समोर येत आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चक्क आता दिवस-रात्र जे या महामार्गावर टोल वसुली करून देतात त्याच यंत्रणेनं यांना अंधारात लोटलं आहे. त्यामुळे आता सरकार यामध्ये पुढाकार घेऊन मार्ग काढते का आणि हा समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा प्रकाशमय मार्ग दाखवतो का? हे बघावं लागेल.
हेही वाचा: