ETV Bharat / state

बुलडाण्यात महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त शोभायात्राचे आयोजन

बुलडाणा शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज १९२ वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले शाळेच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली होती.

author img

By

Published : Apr 11, 2019, 10:38 PM IST

महात्मा फुले जयंती निमित्ताने काढण्यात आलेली शोभायात्रा

बुलडाणा - शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज १९२ वी जयंती साजरी करण्यात आली. जयंती निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले शाळेच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. ढोल ताशांच्या निनादात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा जयघोष करत या शोभायात्रेला सुरुवात झाली.

शहरातील प्रमुख मार्गातून ही शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेतील लेझीम पथकाने चौकाचौकात विविध प्रात्यक्षिके सादर करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. शिवाय संविधान दिंडीही यावेळी काढण्यात आली होती.

या शोभायात्रेमध्ये विदर्भात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांविषयी लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला गेला. तसेच पाणी आडवा पाणी जिरवा, बेटी बचाओ बेटी पढाओ, हा संदेश या शोभायात्रांच्या माध्यमातून देण्यात आला. शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या या विद्यार्थ्यांनी आकर्षक अशा वेशभूषाही साकारल्या होत्या. या शोभायात्रेच्या माध्यमातून सामाजिक समतेचे संदेश देणारे फलकही झळकविण्यात आले.

Intro:Body:बुलडाणा:- क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज १९२ जयंती त्या निमित्य बुलडाणा येथे महात्मा जोतिबा फुले शाळेच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. ढोल ताशाच्या निनादात क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयघोष करत या शोभायात्रेला सुरुवात झाली. बुलडाणा शहरातील प्रमुख मार्गाने हि शोभायात्रा निघाली शोभायात्रेतील लेझीम पथक चौकचौकात विविध प्रात्यक्षिके सादर करून नागरिकांचे लक्ष वेधले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि संविधान यांची दिंडी यावेळी काढण्यात आली होती . याशिवाय या शोभायात्रेमध्ये विदर्भात होणा-या शेतकरी आत्महत्या विषयी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला तसेच पाणी आडवा पाणी जिरवा, आणि पाणी वाचावा .... बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश या शोभायात्रांच्या माध्यमातून देण्यात आला. शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आकर्षक अश्या वेशभूषा साकारल्या होत्या. या शोभायतेच्या माध्यमातून सामाजिक समतेचा देण्याचं काम विद्यार्थ्यांनी केले.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.