ETV Bharat / state

बुलडाण्यात संसर्ग वाढल्याने जीवनावश्यक दुकानांच्या वेळेत बदल - Buldana corona patients

जिल्ह्यातील सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांतर्गत असलेली आस्थापने दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. दुध विक्री व वितरण केंद्र सकाळी 6 ते सकाळी 11 व सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. कृषी संबंधित सर्व दुकाने, आस्थापना व इतर सर्व कार्यालये, बँका, एटीएम, विमा कार्यालये पेट्रोलपंप हे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.

बुलडाणा संचारबंदी
बुलडाणा संचारबंदी
author img

By

Published : Apr 20, 2021, 10:46 PM IST

बुलडाणा - राज्यात 14 एप्रिलच्या रात्री 8पासून 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत 'ब्रेक द चेन' अंतर्गत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. तसेच सदर कालावधीत कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अत्यावश्यक सेवेतील काही बाबी वगळता इतर अत्यावश्यक दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांतर्गत असलेली आस्थापने दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. दुध विक्री व वितरण केंद्र सकाळी 6 ते सकाळी 11 व सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. कृषी संबंधित सर्व दुकाने, आस्थापना व इतर सर्व कार्यालये, बँका, एटीएम, विमा कार्यालये पेट्रोलपंप हे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.

24 तास सुरू राहणाऱ्या सेवा…

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातंर्गत असलेली कार्यालये, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा, पाणी पुरवठा व नगर पालिका, महावितरण ही कार्यालये व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व वैद्यकीय सेवा व त्यासंबंधीच्या इतर सेवा 24 तास सुरू राहतील. हायवेवरील व शहर/गावाबाहेरील पेट्रोल पंप 24 तास सुरू राहतील. खासगी वाहतूक अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील. संबंधितांना सोबत आवश्यक कागदपत्रे बाळगणे बंधनकारक राहील. सार्वजनिक वाहतूक नियमितरित्या सुरू राहील. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये केवळ रूग्णालये, मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला, फळ दुकाने, डेअरी, मटन, चिकन, अंडी, मासे दुकान सुरू राहतील व इतर सर्व सेवा बंद राहतील.

…अन्यथा कारवाई होणार

प्रशासनाचा आदेश 1 मे 2021च्या सकाळी 7पर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहणार आहे. वरील आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिताच्या कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.