बुलडाणा - खामगाव शहरातील केशव नगर भागात पहाटे सकाळी वाघ दिसून आला. ( Tiger found Khamgaon ) सदर दृश्य याच भागात लावलेले सीसीटीव्ही कैद झाले आहे. ( Tiger found ) यामुळे खांमगाव शहरात मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे. व्हिडिओत दिसणारा प्राणी हा वाघाट्या असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे खांमगाव वनपरिक्षेत्र अधिकारी दिपेश लोखंडे दिली आहे.
वन्यजीव, प्रादेशिक, महसूल व पोलीस विभागाकडून वाघाची संयुक्त शोध मोहीम
शनिवारी 4 डिसेंबरच्या पहाटेच्या वेळी शहरातील केशव नगर भागाच्या परिसरात वाघ फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ( Khamgaon Forest Department) हा वाघ आहे. ही पुष्ठी झाल्यानंतर या वाघाल रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल होऊन वन्यजीव, प्रादेशिक, महसूल व पोलीस विभागाकडून संयुक्तपणे घाटपुरी नाक्याजवळ व आसपासच्या भागात वाघाची शोध मोहीम सुरू केली आहे. म्हणून परिसरातील नागरिकांनी गर्दी करू नये, तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच सकाळी मॉर्निंग वाक करणाऱ्यांनीसुद्धा दक्षता घ्यावी. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - ममता बॅनर्जींचा संकल्प देश विकणार्यांची साथ देणारा, तर सामनातून मांडलेली भूमिका देश हिताची - नाना पटोले