बुलडाणा Buldhana Accident News : जिल्ह्यातील मेहकर इथं भिकाऱ्याच्या सायकलला एका दूचाकीची धडक लागून तो जखमी होता. पोलीस तपासात त्याच्या थैलीत आणि गोधडीमध्ये लाखो रुपये मेहकरमधील अनेक बँकांची पासबुक, एटीएम आणि चेकबुक्स सापडले. एखाद्या हिंदी चित्रपटला शोभावी अशी ही घटना इथं घडली आहे.
थैली आणि गोधडी सापडले लाखो रुपये : आठ नोव्हेंबर रोजी एक व्यक्ती स्थानिक महेश येवले यांच्या डोणगाव रोडवरील रुग्णालयासमोरुन सायकलवर जात होता. त्याला एका अज्ञात दुचाकीनं धडक दिली त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर डॉक्टर येवले यांनी उपचार करुन डॉक्टर सातपुते यांच्या रुग्णालयात भरती केले. त्याची थैली आणि गोधडी डॉक्टर येवले हॉस्पिटल समोर पडून होती. जी त्याच्या सायकलवर होती. डॉक्टरांनी मेहकर पोलिसात माहिती दिल्यानं, पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी सदर व्यक्तीच्या थैलीतील लाखो रुपये सापडले. पोलिसांनी ते ताब्यात घेऊन रुग्णाला पुढील उपचारासाठी अकोला इथं पाठवलं. रुग्णाची थैली येवले हॉस्पिटल समोर आठ नोव्हेंबर रोजी दिवसभर होती. तरही तिला कोणीही हात लावला नाही.
अनेक बँकांची सापडली पासबुके : गोधडीमध्ये आणखी मोठी रक्कम, अनेक बँकांची पासबुके, चेक बुक, एटीएम आणि चिल्लरनी भरलेली थैली पोलिसांना सापडली. मेहकर अर्बन बँक (Mehkar Urban Co-op Bank) पासबुक एक लाख 9,284 रुपये व प्लास्टिकच्या दोन कॅरीबॅगमध्ये तीन ते चार हजार रुपयाची चिल्लर तसेच इतर अनेक बँकांचे पासबुके, मोठी रक्कम पाहून पोलीसही चक्राहून गेले. बँकेतील जमा इंट्रीज जुने आहेत. कदाचित गेल्या काही महिन्यात आणखी रक्कमा जमा केल्या असाव्यात.
तपासा सापडलेली रक्कम केली सुपूद : अकोला इथं त्या श्रीमंत भिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह १० नोव्हेंबर रोजी मेहकर इथं आणला गेला. त्याच्या थैलीतील कागदपत्रावरुन तो अंजनी बुद्रुक येथील रहिवासी असल्याचं स्पष्ट झालं. ठाणेदार राजेश शिंगटे, सहाय्यक फौजदार संग्राम ब्राह्मणे आणि स्थानिक पत्रकार असे सगळे त्याच्या गावी पोहोचले. मृतक दीपक बाबुराव मोरे वय वर्ष 48 याची पत्नी चंदा दीपक मोरे, मुलगा धम्मपाल दीपक मोरे यांच्याकडं पोलिसांनी तपासात सापडलेली रक्कम, पासबुक, एटीएम आणि चेक सुपूद केला.
सायकलवरून जाताना झाला अपघात : मृतक दीपक मोरे हा शहरात गेल्या अनेक दिवस भिक मागत होता. सोबतच भंगार जमा करुन ते विकण्याचं काम करत होता, असं ठाणेदार शिंगटे यांनी सांगितलं. अंजनी बुद्रुक इथं मृतकाचं घर आहे. अतिशय गरीबीच्या परिस्थितीत मृतकाची पत्नी व मुलगा जीवन व्यतीत करत असल्याचं दिसून आलं. दीपक मोरे यांना तीन विवाहित मुलं आहेत. कुणी कल्पनाही करू शकणार नाही, अशी अफलातून घटना इथं घडली आहे. त्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेल अशी घटना कमालीची चक्रावून टाकणारी आहे. भिक मागणाऱ्या मृतकाच्या सायकलवरुन जाताना अपघात होतो आणि त्यातून त्याच्याकडं मोठे घबाड उघडकीस येतं, हे सगळे नाट्यमय वाटलं असलं तरी खरं आहे.
हेही वाचा -