बुलडाणा - पुणे येथील कोंढवा परिसरात रात्री उशिरा एक संरक्षण भिंत कोसळली. त्याखाली १५ मजूरांचा मृत्यू झाला. एवढी मोठी घटना घडली असताना कामगार मंत्री संजय कुटे मात्र या घटनेबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
बुल[डाणा जिल्हा दौऱ्यावर आले असता, यावर घटनेच्या १२ तासानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आपल्याला घटनेबाबत पुसटशी कल्पना असून चौकशी करून जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शेगाव येथील विश्रामगृहात पत्रकारांशी ते बोलत होते. तर मंत्रिपद मिळाल्या नंतर आज शनिवारी२९ जून रोजी जिल्ह्यात त्यांचे प्रथम आगमन संतनगरी शेगाव येथे आगमन झाले. तिथे त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले. हारतुरे स्वीकारत त्यांनी कार्यकर्ते सोबत सेल्फी मोठ्या थाटामाटात काढली, दुसरीकडे १५ मजूरांचा अपघाती मृत्यू होतो, या घटनेचे गांभीर्य मंत्री महोदयाना नसल्याचे दिसून आले.