बुलडाणा - जागतिक महामारी असलेल्या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी गेली पाच महिने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र आता अर्थव्यवस्थेला खिळ बसत असल्याने देश अनलॉक करण्यात येत आहे. या लॉकडाऊन काळात अनेक विकास कामे ठप्प झाली होती. त्याप्रमाणे सिंदखेड राजा येथील राजमाता माँसाहेब जिजाऊ याच्या जन्मस्थळाच्या विकासाचे कामही ठप्प झाले आहे. येथील राजवाड्याची सध्या दूरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निधी देऊन या जन्मस्थळाच्या विकासाचे काम सुरू करावे, अशी मागणी शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींकडून करण्यात येत आहे.
लॉकडाऊन काळात ठप्प झाली राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाची विकास कामे
सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळ असलेल्या राजवाड्याचे विकास काम सध्या ठप्प झाले आहे. राज्यशासनाने या कामासाठी विकासनिधी उपलब्ध करून देऊन. तत्काळ कामाला सुरूवात करावी अशी मागणी, शिवप्रेमींकडून केली जात आहे.