ETV Bharat / state

'पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी माझी' - खामगाव विधानसभा मतदार संघ

पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे, अशी ग्वाही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ऐनवेळी दिलीपकुमार सानंदा यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा पक्षाकडे लिखित स्वरुपात केला आणि उमेदवारी नाकारली होती.

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा
author img

By

Published : Oct 7, 2019, 2:19 PM IST

बुलडाणा - खामगाव विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून आपण उमेदवारी नाकारली. मात्र, पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे, अशी ग्वाही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा

विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिल्यानंतरही ती सानंदा यांनी नाकारली होती. यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी प्रथमच बोलत होते. मागील तीन पंचवार्षिकमध्ये विजय संपादन करणारे काँग्रेसचे आमदार सानंदा यांना 2014 मध्ये 3700 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पाच वर्षात सानंदा यांनी मतदारसंघातील जनतेशी ठेवलेला संपर्क आणि पक्षासाठी केलेले आंदोलने पाहता त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे चित्र होते. ऐनवेळेवर दिलीपकुमार सानंदा यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा पक्षाकडे लिखित स्वरुपात केला आणि उमेदवारी नाकारली. यामुळे खामगाव मतदारसंघांमध्ये काय होईल? या चर्चेला संपूर्ण जिल्हाभरात उधाण आले होते.

हेही वाचा - मी काँग्रेस सोडणार नाही, आमदार बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम

असे असताना सानंदा यांनी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानाशी संबंधित असलेले गणेश घराण्यातील ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या नावाची शिफारस करून मतदारसंघातील राजकारणात मोठी उलट फेर करून दिली. त्यामुळे भाजपाचे आमदार अ‌ॅड. आकाश फुंडकर यांच्याविरुद्ध काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार ज्ञानेश्वरदादा पाटील यांची लढत तुल्यबळ होईल, असे मानले जात आहे. अशावेळी सानंदा यांनी प्रथमच प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन पक्षाने दिलेला उमेदवारला निवडून आणण्याची जबाबदारी आपली असून त्यासाठी सर्वस्व पणाला लावले जाईल, अशी ग्वाही दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर कडाडून टीकाही केली.

Intro:Body:
बुलडाणा : खामगाव विधानसभा मतदार संघासाठी काँग्रेस पक्षाकडून आपण उमेदवारी नाकारली मात्र पक्षाने दिलेल्या उमेदवारा ला निवडण्याची जबाबदारी माझी असल्याची ग्वाही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिल्यानंतरही ती सानंदा यांनी नाकारली होती यानंतर ते प्रसिद्धिमाध्यमांशी प्रथमच बोलत होते.
मागील तीन पंचवार्षिक मध्ये विजय संपादन करणारे काँग्रेसचे आमदार दिलीपकुमार सानंदा यांना सन 2014 मध्ये 3700 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पात्र पाच वर्षात सानंदा यांनी मतदारसंघातील जनतेशी ठेवलेले संपर्क आणि पक्षासाठी केलेले मोठमोठी आंदोलने पाहता याशिवाय मतदारसंघात काँग्रेस पक्षामध्ये कुठलाही मोठा नेता नसल्याने सानंदा यांनाच उमेदवारी मिळेल असे चित्र असताना ऐनवेळेवर दिलीपकुमार सानंदा यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा पक्षाकडे लिखित स्वरूपात केला आणि उमेदवारी नाकारली. यामुळे खामगाव मतदारसंघांमध्ये काय होईल या चर्चेला संपूर्ण जिल्हाभरात उधाण आले होते. असे असताना सानंदा यांनी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान शी संबंधित असलेले गणेश घराण्यातील ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या नावाची शिफारस करून मतदारसंघातील राजकारणात मोठी उलट फेर करून दिली. त्यामुळे भाजपाचे आमदार एड. आकाश फुंडकर यांच्याविरुद्ध काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार ज्ञानेश्वरदादा पाटील यांची लढत तुल्यबळ होईल असे मानले जात आहे. अशावेळी सानंदा यांनी प्रथमच प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन पक्षाने दिलेला उमेदवार ला निवडून आणण्याची जबाबदारी आपले असून त्यासाठी सर्वस्वी पणाला लावल्या जाईल अशी ग्वाही पत्रकारांशी बोलताना दिली. तर यावेळी विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली.

बाईट - दिलीपकुमार सानंदा (माजी आमदार)

- फहीम देशमुख, खामगाव (बुलडाणा)
मोबा- 9922014466
----------------------------------------------
Attach Vidio File - 05
Attach Foto File -00
Attach Audio File - 00
-----------------------------------------------Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.