बुलडाणा - जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. पाणी टंचाईपाठोपाठ आता चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला असून दुष्काळी परिस्थितीला लक्षात घेता सरकारने जिल्ह्यात चारा छावण्य़ा सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चाऱ्याच्या उपलब्धतेअभावी जीवपाड जपलेली जनावरे सांभाळायची कशी, असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे जणावरे विकल्या शिवाय आमच्या समोर पर्याय उरला नसल्याने मालेगाव येथील जनावरांच्या आठवडी बाजारात एरवी लाखोंची होणारी उलाढाल नगण्य झाली आहे. लाख मोलांचे पशुधन कवडी मोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शासनाने उपाययोजना म्हणून चारा छावण्या सुरू करण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत.