ETV Bharat / state

बुलडाण्यासह चिखली मतदारसंघात मतदार यादीतून 21 हजार 379 बोगस मतदार वगळले

बुलडाणा आणि चिखली विधानसभा मतदार संघातील 22 हजार 207 मतदारांपैकी तब्बल 21 हजार 379 मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. याबाबतची माहिती विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी तथा बुलडाणा तहसीलदार रुपेश खंदारे यांनी दिली आहे.

बुलडाण्यासह चिखली मतदारसंघात मतदार यादीतून 21 हजार 379 बोगस मतदार वगळले
बुलडाण्यासह चिखली मतदारसंघात मतदार यादीतून 21 हजार 379 बोगस मतदार वगळले
author img

By

Published : Jul 8, 2021, 4:08 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यात मतदार यादीत नावासमोर फोटो नसलेल्या मतदारांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुलडाणा आणि चिखली विधानसभा मतदार संघातील 22 हजार 207 मतदारांपैकी तब्बल 21 हजार 379 मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. याबाबतची माहिती विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी तथा बुलडाणा तहसीलदार रुपेश खंदारे यांनी दिली आहे. वगळलेल्या मतदारांमध्ये बुलडाणा विधानसभा मतदार संघातील 17 हजार 889 तर, चिखली मतदार संघातील 3 हजार 490 मतदारांचा समावेश आहे. वगळलेल्या मतदारांपैकी काही मतदार बाहेर गावी गेले आहेत. तर, काही मतदार हे बोगस मतदार होते.

बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा आणि चिखली विधानसभा मतदार संघातील 22 हजार 207 मतदारांपैकी तब्बल 21 हजार 379 मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. त्याबाबत माहिती देताना तहसीलदार रुपेश खंदारे

'बोगस मतदान करतात'

बुलडाणा व चिखली मतदार संघातील मतदार याद्यांमधील अनेक मतदारांच्या नावासमोर फोटो नाहीत. अशा मतदारांची डिसेंबर 2020 मध्ये शोध मोहीम बीएलो मार्फत करण्यात आली. यामध्ये बुलडाणा विधानसभा क्षेत्रातील व चिखली मतदार क्षेत्रातील 22 हजार 207 मतदार आपल्या मूळ पत्त्यावर सापले नाहीत. याबाबत जानेवारी, फेब्रुवारी आणि मे महिन्यात पत्त्यावर आढळून न आलेल्या मतदारांसाठी गावनिहाय व शहर निहाय मतदार यादी तयार करण्यात आली. त्यानंतर या मतदारांना सूचित करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपरिषदांमध्ये जाहीरनामे लावण्यात आले. याला प्रतिसाद न मिळाल्याने मतदारांना आणखी एक संधी म्हणून जून महिन्यामध्ये राजकीय पक्षांचा आधार घेण्यात आला.

'वगळण्यात आलेले मतदार हे बोगस मतदार'

यामध्ये आपल्या मूळ पत्त्यावर आढळून न आलेल्या मतदारांची याद्या देवून हे मतदार जर आपल्या संपर्कातील असतील तर त्यांना आपला फोटो आणि त्यांचे कागदपत्रे बुलडाणा तहसील कार्यालयात जमा करावेत असे सुचवले होते. मात्र, राजकीय नेत्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर बुलडाणा आणि चिखली विधानसभा क्षेत्रातील तब्बल 21 हजार 379 मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात आल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंदारे यांनी दिली आहे. वगळण्यात आलेले मतदार हे बोगस मतदार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या मतदारांच्या नावे किंवा या मतदारांना दुसऱ्या ठिकाणाहून आणून मतदार करून घेतले जात असल्याचेही बोलले जात आहे. या कारवाईमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रुपेश खंदारे यांच्यासोबत तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार एम. डी. नैताम सहा 3 कर्मचारी व 330 बीएलोंनी परिश्रम घेतले.

एवढे वगळण्यात आले मतदार

बुलडाणा तालुक्यातील 13 हजार 310 मतदारांपैकी 13 हजार 63 मतदार व मोताळा तालुक्यातील 5 हजार 160 मतदारांपैकी 4 हजार 826 मतदार व चिखली मतदार संघाच्या मतदार याद्यांमध्ये 3 हजार 773 मतदारांपैकी 3 हजार 490 मतदार आपल्या मूळ पत्त्यावर आढळून न आल्याने त्यांना मतदान याद्यांमधुन वगळण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.