ETV Bharat / state

धक्कादायक..! कोविड रुग्णालयातील जैविक कचरा फेकला रस्त्याच्या कडेला, बुलडाण्यातील प्रकार - biological waste dumped RTO office Malkapur Highway

कोविड रुग्णालयात वापरण्यात आलेले बायो वेस्टे मेडिकल मटेरियल (जैविक कचरा) मलकापूर महामार्गावरील आरटीओ कार्यालयाच्या बाजूच्या रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला. यातून नागरिकांच्या जिवाशी खेळ करत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.

biological waste dumped RTO office Malkapur Highway
कोविड रुग्णालय कचरा रसत्याच्या कडेला बुलडाणा
author img

By

Published : May 25, 2021, 4:28 PM IST

बुलडाणा - संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात कोरोनाची भयावह परिस्थिती असताना कोरोनाची वाढती साखळी तोडण्याच्या अनुषंगाने राज्य सरकार गांभीर्याने पावले उचलत आहे, मात्र जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे याप्रकरणी पूर्णतः दुर्लक्ष असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.23 मे) संध्याकाळी समोर आला आहे. कोविड रुग्णालयात वापरण्यात आलेले बायो वेस्टे मेडिकल मटेरियल (जैविक कचरा) मलकापूर महामार्गावरील आरटीओ कार्यालयाच्या बाजूच्या रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला. यातून नागरिकांच्या जिवाशी खेळ करत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.

माहिती देताना नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी

हेही वाचा - खाकी वर्दीतील माणूसकी, पोलीस अधिकाऱ्यांकडून आपल्या सहकाऱ्याच्या उपचारासाठी 30 लाखांची मदत

या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कोविड रुग्णालयातील उपचारासाठी वापरण्यात आलेले इंजेक्शन, औषधी, पीपीई किट, हॅन्ड ग्लोज, ऑक्सिजनचे साहित्य, रबरी नळ्या, यासह इतर आरोग्यास धोकादायक साहित्य मलकापूर रोडवरील आरटीओ ऑफिसच्या बाजूला रस्त्याच्या कडेला टाकले असल्याचे निदर्शनास आले. मलकापूर रोडवरील आरटीओ ऑफिस जवळील हा परिसर निसर्गरम्य वातावरण असल्याने शहरातील जेष्ठ नागरिक सकाळ - संध्याकाळ वॉकसाठी या परिसरातून जात असतात, त्यामुळे या संतापजनक प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गुन्हे दाखल होणार

हे सर्व जैविक साहित्य गाईडलाईन प्रमाणे जमिनीत पुरवून नष्ट करावे लागते. असे असताना देखील आरोग्य विभागाचा कोविड नोंदणी झालेल्या रुग्णालयांवर काहीच वचक नसल्याने आणि पूर्णतः दुर्लक्ष केल्याने आरोग्य प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी स्वप्नील लघाणे, आरोग्य सभापती आशिष (सोनू) जाधव, आरोग्य निरीक्षक सुनील बेंडवाल यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. हे सर्व साहित्य कोणत्या कोविड रुग्णालयाचे आहे, याची नगरपरिषदेकडून चौकशी करण्यात येत असून चौकशीअंती रुग्णालय, डॉक्टरांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली इशारा देण्यात आला.

गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने रात्रीच जाळून केले पुरावे नष्ट

वापरलेले मेडिकल साहित्य रस्त्याच्या कडेला फेकल्या प्रकरणी आपल्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, या भीतीपोटी रात्रीतून अज्ञात व्यक्तीने हे सर्व पुरावे जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. तरीही हे साहित्य अर्धवटच जळाले, त्यामुळे आरोग्य विभाग आता या प्रकरणावर काय आणि कोणावर कारवाई करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विल्हेवाट लावण्यासाठी एजन्सी नियुक्त

रुग्णालयातील बायो वेस्टे मेडिकल मटेरियलची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून निविदा काढण्यात येते. त्याप्रमाणे जालना येथील एका एजन्सीला बायो वेस्टे मेडिकल मटेरियलची विल्हेवाट लावण्यासाठी ठेका देण्यात आला आहे. त्या एजन्सी मार्फत रुग्णालयातील बायो वेस्टे मेडिकल मटेरियल घेऊन जाऊन ते त्याची विल्हेवाट लावत असतात. आणि कोणी जर रुग्णालयातील बायो वेस्टे मेडिकल मटेरियल अशा पद्धतीने फेकत असतील तर दंडनीय अपराध आहे, अशी प्रतिक्रिया नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी स्वप्नील लघाणे यांनी दिली.

हेही वाचा - बुलडाण्यात गुटख्याच्या गोडाऊनवर पोलिसांचा छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.