बुलडाणा - डॉक्टरांचा सल्ला न घेता कोरोना सारख्या साथीच्या काळात रुग्णालये चालवणे आणि रुग्णांस उपचार देणे अव्यवहार्य आणि अशक्य आहे. यामुळे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 31 ऑगस्टच्या परिपत्रकातील सूचनांच्या विरोधात इंडियन मेंडीकल असोसिएशनच्या (आय.एम.ए.) वतीने डॉ. ज. बी. राजपूत यांच्या नेतृवात आंदोलन करण्यात येणार आहे. यात 11 सप्टेंबरला स्थानिक जयस्तंभ चौकात सकाळी 11 वाजता एकत्र येवून मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशनच्या प्रतिकृतींची होळी करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 31 ऑगस्टच्या परिपत्रकातील सूचनांनुसार रुग्णालये चालवणे आणि रुग्णांस उपचार देणे अव्यवहार्य आणि अशक्य असल्याने, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 4 सप्टेंबरला झालेल्या राज्यस्तरीय प्रतिनिधी परिषदेत सदर परिपत्रक पूर्णपणे फेटाळण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. याबाबत आयएमने महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी न्यायाची मागण्या केल्या. मात्र, या केलेल्या मागण्यांकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ 7 सप्टेंबरपासून राज्यात सर्वत्र संघर्षाचा पवित्रा घेत विविध मार्गाने लढा सुरू करण्यात आला. डॉक्टरांवरील दडपशाही वागणुकीबद्दल, अपमानस्पद वक्तव्याबाबत आणि अन्यायकारक रुग्णालय दरांविरोधात 11 सप्टेंबरला बुलडाण्याच्या स्थानिक जयस्तंभ चौकात सकाळी 11 वाजता एकत्र येवून मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशनच्या प्रतिकृतींची होळी करण्यात येणार आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षण टिकवणारच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रण