ETV Bharat / state

बुलडाणा : जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्री; तस्करांवर कारवाईची मागणी - sameer khan buldana

खामगावमधील गुटखा तस्करच जिल्हाभरात गुटखा पोहोचवतात असा आरोप समीर यांनी केला आहे. खामगावातील मुख्य अवैध गुटखा तस्करांची चौकशी करून त्यांच्याविरूद्ध अन्न व औषध कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा 2 डिसेंबरला कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे

gutkha
गुटखा तस्करांवर कारवाईची मागणी
author img

By

Published : Nov 29, 2019, 8:30 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यात गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. ही विक्री तत्काळ बंद करुन खामगाव शहरातील मुख्य गुटखा तस्करावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता समीर खान यांनी केली आहे. त्यांनी आज जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना यासंबंधीचे निवेदन दिले. कारवाई न झाल्यास स्वतः गुटख्याच्या गोडाऊनवर धाड टाकण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ता समीर खान

हेही वाचा - गुटखा माफियांवर जालना पोलिसांची कारवाई; दोन लाखांचा गुटखा जप्त

खामगावमधील गुटखा तस्करच जिल्हाभरात गुटखा पोहोचवतात असा आरोप समीर यांनी केला आहे. खामगावातील मुख्य अवैध गुटखा तस्करांची चौकशी करून त्यांच्याविरूद्ध अन्न व औषध कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा 2 डिसेंबरला कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Intro:Body:बुलडाणा:- संपूर्ण राज्यात गुटखाबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.मात्र बुलडाणा जिल्ह्यात प्रशासनाच्या नजरेखाली पानटपऱ्या, शाळा,कॉलेज परिसर ,सार्वजनिक स्थळ,किराणा दुकान तथा हॉटेल सह आदी ठिकाणी सर्रास नजर,विमल,गोवा सह सुगंधित तंबाखू गुटख्याची सरर्स विक्री सुरू असून ही विक्री तात्काळ बंद करुन खांमगावतील मुख्य गुटखा तस्करावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन बुलडाण्यातील सामाजिक कार्यकर्ता समीर खान यांनी जिल्हाधिकारी,अन्न व औषध प्रशासन तथा जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिले आहे.कारवाई न झाल्यास 2 डिसेंबरला धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.याउपरही कारवाई न झाल्यास स्वतः गुटख्याच्या गोडाऊनवर धाडी टाकण्याचा इशारा देखील समीर खान कडून देण्यात आले आहे..

समीर खान यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,विदर्भात सर्वत्र अवैद्य पणे गुटका तस्कर खामगाव येथून सर्व ठिकाणी होत आहे.तसेच बुलडाणा जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री होत आहे विशेष म्हणजे आपल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयासमोर खुलेआम गुटका विक्री होत असून यामुळे आपले विभागावर प्रश्न निर्माण होत आहे. गुटख्यामुळे अनेक नागरिकांचे कर्करोगाचा आजार होऊन जीव गेलेला आहे व त्यांचे संसार उघड्यावर आले आहे.तर नवीन पिढी गुटक्याच्या आहारी जात आहे. काही अवैद्य गुटखा तस्करी करणाऱ्यांची नावे तोंडी देण्यात आली आहे. त्यांचे विरुद्ध कारवाई करावी आणि चौकशी करावी. खांमगावातील मुख्य अवैद्य गुटखा तस्करी करणाऱ्यांची चौकशी करून गुटख्याची मुख्य तस्करी करणाऱ्या विरुद्ध अन्न व औषध कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. तसेच बुलडाणा शहरातला अवैध गुटखा बंद करण्यात यावा.अन्यथा कार्यालयासमोर 2 डिसेंबर ला आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते समीर खान यांनी दिला..

बाईट:- समीर खान , सामाजिक कार्यकर्ता,बुलडाणा

-वसीम शेख, बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.