ETV Bharat / state

‘तो’ शासननिर्णय रद्द करा; महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाची मागणी - शासन निर्णय रद्द

राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने 26 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करुन कोविडच्या प्रादुभार्वामुळे शासकीय रेखा कला परिक्षा आयोजित न करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्याच बरोबर शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय रेखा कला परिक्षेचे गुण देण्यात येवू नये.

कला शिक्षक महासंघ
कला शिक्षक महासंघ
author img

By

Published : Mar 31, 2021, 8:10 PM IST

बुलडाणा - देशभरात कोविड विषाणूच्या थैमानामुळे शाळा बंद आहे. त्यामुळे कला संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्षात घेतल्या जाणाऱ्या परीक्षा झाल्या नाहीत. यावर्षी जे विद्यार्थी माध्यमिक शालान्त परीक्षेत प्रविष्ट झालेले आहेत. त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या चित्रकला विषयातील सवलतीच्या गुणांपासून वंचित राहावे लागणार आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी शासन निर्णय रद्द करण्याची मागणी शिक्षक महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

..तर शासन निर्णयामुळे लाखो विद्यार्थी गुणांपासून वंचित

राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाने 26 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करुन कोविडच्या प्रादुभार्वामुळे शासकीय रेखा कला परीक्षा आयोजित न करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्याच बरोबर शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय रेखा कला परिक्षेचे गुण देण्यात येवू नये. असे निर्देश दिल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी सवलतीच्या वाढीव गुणांपासून वंचित राहणार आहे. करीता विदर्भ कला शिक्षक संघ बुलडाणा यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

हेही वाचा-इशरत जहां प्रकरणी सीबीआयने तीन पोलीस अधिकाऱ्यांना केले डिस्चार्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.